आता ‘या’ जिल्ह्यात होणार जरांगे पाटलांची सभा!

पुणे | मराठा आरक्षणासाठी दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करत आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांची जालना (Jalana) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात सभा घेतली होती. त्यांच्या सभेला लाखो लोक उपस्थित होते. दरम्यान जरांगे पाटील आता पुण्यात सभा घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

पुण्यात कधी होणार सभा?

मनोज जरांगे पाटील यांची पुणे (Pune) जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. येत्या 20 ऑक्टोबरला ही सभा पार पाडणार असून या सभेसाठी 100 एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली आहे.

पुणे येथे पहिल्यांदाच जरांगे पाटिल यांची सभा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील लाखो मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या सभेला हजर होणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

थोडक्यात बातम्या-