“संजय राऊत जेवढं थोबाड उघडणार तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार”

सिंधुदुर्ग | नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत थोबाड उघडणार तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खड्ड्यात जाणार, असा घणाघात नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर केलाय.

उद्या राम भक्तांना काय गालबोट लागलं तर जबाबदार उद्धव ठाकरे असणार आहेत. संजय राऊत ठाकरे गटाची किती वाट लावणार ह्याला मर्यादा नाही. संजय राऊत जेवढं थोबाड उघडणार तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार, अशी टीका नितेश राणेंनी केलीये.

दीपक केसरकर यांनी म्हणाल्याप्रमाणे, संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरे आणि मोदी भेट झाली नाही. संजय राऊत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रभाव टाकत आहेत. याची दखल न्यायालयाने घ्यावी, असंही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत तुझं वेळ पत्र ठरलेलं आहे. तुझ्या घरातील एक माणूस आणि तू दिवाळीत जेलमध्ये जाणार आहे. हिंमत असेल तर 24 तासासाठी संरक्षण सोड. मग जुने शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते तुझे कपडे काढून गाढवावरून तुझी धिंड काढतील. ज्याला बाळासाहेब कळले नाहीत. ज्यांच्यासोबत बाळासाहेबांनी युती केली नाही. त्यांचे गोडवे आता राऊत गात आहे. त्यांच्या प्रेमात पडला आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर ठाकरे गट नावाची सेना शिल्लक राहणार नाही, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-