जरांगे पाटलांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तब्बल 17 दिवस मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं.

जरांगे पाटलांनी त्यानंतर राज्याच्या अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या सभेला लाखो लोक उपस्थित असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची संवाद यात्रा चालू आहे. मराठा आरक्षणाविषयी आक्रमक झालेले जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. जर येत्या 10 दिवसात आरक्षण नाही मिळालं तर मी खूप टोकाचं पाऊल उचलेल, असं जरांगे पाटील म्हणाले. मात्र आता जरांगे पाटील यांनी थेट भारताचे पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना यामध्ये लक्ष देण्यास सांगितलं.

काय म्हणाले जरांगे पाटील ?

माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले, की मराठ आरक्षणाबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच गृहमंत्री आमित शाहा (Amit Shaha) यांनी लक्ष घालावं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करावी असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारकडे मागणी केली.

थोडक्यात बातम्या-