एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची मंगळवारी ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये बैठक बोलावण्यात आली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतलाय.

दसरा मेळावा शिवतीर्थावर भरवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून यावर्षीदेखील प्रयत्न करण्यात आला. पण ऐनवेळी शिंदे गटाने स्वत:हून माघार घेतली. याचबाबत एकनाथ शिंदे यांनी बैठकीत महत्त्वाची घोषणा केली.

बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानावर होतोय. मैदानासाठी वाद विवाद नको. यापुढे शिवतिर्थासाठी अर्ज करायचाच नाही, अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

गेल्यावेळी मेळाव्यात धनुष्यबाण आणि शिवसेना नाव नव्हतं. आता खरी शिवसेना आहे. त्यांना धडकी भरली होती, प्रॉपर्टी, पैसे, मालमत्ता नेतील. पण बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या 2024 ला महाराष्ट्रात 45 जागा आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-