मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता यावरून मनसेने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी अजित पवारांना डिवचलंय.
कायम उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाव येतं. दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की मात्र अचानक कुठलं तरी विघ्न येतं, असा खोचक टोला गजानन काळे यांनी अजित पवारांना लगावला आहे.
दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की मात्र अचानक कुठलं तरी विघ्न येतं. कधी ते विघ्न धरणाचं असतं तर कधी ते घोटाळ्यांचं असतं. अजितदादा म्हणजे घोटाळा, भ्रष्टाचार हे त्यांचे समानार्थी शब्द झालेत, असंही ते म्हणालेत.
अजित दादांचे प्रवक्ते घासलेट चोर त्यांच्याबाबत स्पष्टीकरण देऊन त्यांचे सुद्धा घासलेट संपले की काय? असे आता महाराष्ट्राला वाटू लागलंय, असे म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांना खोचक टोला लगावलाय.
महत्त्वाच्या बातम्या-