‘…हे थांबवा अन्यथा महागात पडेल’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सूचक इशारा 

मुंबई | छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला (Mumbai) जात असतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे मध्यरात्री 2 वाजता नाशिक (Nashik) शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते.

काही दिवसांपूर्वीच जरांगे यांनी छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात (Yeola) सभा घेतली होती, या सभेदरम्यान स्वागतावेळी जेसीबीवरून पुष्पवृष्टी करतांना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या विलास गाढे यांची त्यांनी रुग्णालयात भेट घेतली.

डॉक्टरांशी देखील गाढेंच्या तब्येतीबाबत विचारपूस केली, मराठा समाज बांधव यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रस्थापित मराठा नेत्यांमुळेच आमच्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील व्यक्तिगत विरोध नसल्याचं जरांगे पाटील म्हणालेत.

आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. मात्र आता प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली असून त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. सरकारने मात्र आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी बळीची अपेक्षा आहे का?. सरकारने हे थांबवलं पाहिजे नाहीतर महागात पडेल, असा सूचक इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .