एकनाथ शिंदेंना धक्का देणारी बातमी समोर; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

पांडुरंग बरोरा हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु 2019मध्ये बरोरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर जाऊन हाती शिवबंधन बांधले होते. त्याच वेळी राष्ट्रवादीने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दौलत दरोडा यांना उमेदवारी दिली. दौलत दरोडा यांनी पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला. आता तेच दौलत दरोडा हे अजित पवार यांच्या गटात गेल्याने पांडुरंग बरोरा यांची कोंडी झाली.

पांडुरंग अखेर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट-शरद पवार गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-