Self Confidence in Your kid l पालकांनो, लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Self Confidence in Your kid l आपल्या मुलांनी भविष्यात यशस्वी आणि आनंदी व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. ही मुलं कुठेही गेली तरी प्रसिद्ध होतात आणि आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करतात. हे करण्याची ताकद आत्मविश्वासातून मिळते. प्रत्येक मूल हा काही गुण घेऊन जन्माला येतो. यापैकी एक गुण म्हणजे आत्मविश्वास. लहान मुलांमध्ये आत्मविश्वास भरलेला असतो.

मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ न देण्याची जबाबदारी पालकांची :

वयाच्या सहाव्या किंवा सातव्या टप्प्यात पोहोचल्यावर त्यांचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. शाळा, घर आणि परिसरात सतत वाढणाऱ्या अपेक्षा आणि स्पर्धेमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर (Self Confidence in Your kid) मोठा परिणाम होतो. त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ न देण्याची जबाबदारी पालकांची आहे. तर आज आपण लहान मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे जाणून घेऊयात…

त्यांच्या स्वप्नांना पंख द्या :

लहान मुलांच्या स्वप्नांना पंख देणे हे सर्वात महत्वाचे आहे. जेव्हा तुमचे मूल तुम्हाला त्याचे स्वप्न सांगतात त्यावेळी त्याची चेष्टा करू नका. तसेच त्याला पडलेल्या पडलेल्या (Self Confidence in Your kid) स्वप्नाबद्दलची निंदा करू नका. अशावेळी त्याला समजून घ्या आणि त्याच्या स्वप्नांना बळ द्या. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना विश्वास द्या की ते काहीही साध्य करू शकतात.

योग्य गोष्टींची प्रशंसा करा :

ऑफिसमधलं एखादं काम उत्तमरीत्या पूर्ण करणं असो किंवा एखादी उत्तम रेसिपी बनवणं असो, जेव्हाही आपण चांगलं काम करतो तेव्हा आपल्याला नक्कीच प्रशंसा हवी असते. कौतुकामुळे आपल्याला स्वतःवर आणि आपल्या कामावर आत्मविश्वास येतो. आपण हे केले असेल तर भविष्यात आपण काहीही करू शकतो याची हिंमतही त्यातून मिळते.

Self Confidence in Your kid l मुले देखील त्यांच्या पालकांकडून प्रशंसा मिळविण्यासाठी आतुर असतात. छान चित्र काढणे असो किंवा त्यांची खेळणी (Self Confidence in Your kid) योग्य ठिकाणी ठेवणे असो, मुलांनी त्यांच्या कामाची दखल घ्यावी आणि त्यांचे कौतुक करावे असे वाटते. म्हणूनच मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करा. यामुळे त्यांना चांगले काम करण्याची स्वतःमध्ये प्रेरणा तयार निर्माण होते.

परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवा :

अनेक लोक अडचणीत आश्चर्यचकित होतात. कारण त्यांना परिस्थितीला (Self Confidence in Your kid) कसे सामोरे जायचे हे माहित नसते. नवीन प्रकारचे लोक, नवीन प्रकारचे विचार आणि त्यांच्या स्वतःहून वेगळ्या गोष्टी त्यांना अडचणीत आणतात. म्हणून आपल्या मुलाला सर्व सुखसोयी द्या पण त्याला हे सर्व मिळणार नाही अशा परिस्थितीसाठी देखील तयार करा.

महत्वाच्या घडामोडी :

Maharashtra Politics | निकाल लागला! जुना फोटो शेअर करत सुळेंची ठाकरेंसाठी बॅटिंग, कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

Maharashtra Politics | “भाजपच्या दिल्लीतील मालकांनी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Post Office RD scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायद्याची!

Bigg Boss 17 | अंकिता-विकीचं भांडण बाजूलाच, ‘सासूबाई’लाच सुनावले जातायेत खडेबोल