Maharashtra Politics | निकाल लागला! जुना फोटो शेअर करत सुळेंची ठाकरेंसाठी बॅटिंग, कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Politics | महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी बहुप्रतिक्षित अशा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण, शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं अन् राजकारण तापलं. पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येत नसल्याचंही नार्वेकरांनी नमूद केलं. नार्वेकरांनी निकाल देताच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला लक्ष्य केले.

Maharashtra Politics सुळेंची ठाकरेंसाठी बॅटिंग

महाविकास आघाडी म्हणून एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) आणि काँग्रेसने आपला सहकारी ठाकरे गटाला पाठिंबा दिला. पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निकालावर व्यक्त होताना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा जुना फोटो शेअर केला आहे. “मराठी मुलुखात सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून देशभरात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे हे दोघे साठीच्या दशकातील नेते. आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या गौरवास्पद कामगिरीचा”, असे सुळेंनी पोस्टमध्ये म्हटले.

 

तसेच त्यांनी उभे केलेले कार्य मोडून काढण्यासाठी त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट-कारस्थानं सुरू आहेत, पण त्यांचे निष्ठावंत सहकारी त्याला धक्का लावू देणार नाहीत. मराठी स्वाभिमानाचा झेंडा आकाशात फडकत राहील. यासाठी प्रयत्नांची शर्थ करू व त्यांना अभिमान वाटेल असे कार्य आपण उभे करू, असेही त्यांनी नमूद केलं.

अवघ्या देशाच्या राजकारणाचं ज्या निर्णयाकडं लक्ष लागून होतं तो सत्तासंघर्षाचा निकाल अखेर बुधवारी लागला. राहुल नार्वेकरांनी बुधवारी लाईव्ह प्रक्षेपणात निकालपत्राची प्रत वाचून दाखवली. शिंदेंकडे बहुमत असल्यामुळे त्यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला.

शिवसेना शिंदेंचीच…

राहुल नार्वेकरांनी शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्हीही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. मात्र, शिवसेना कुणाची या मुद्द्यावरून राजकारण तापलं. शिवसेना शिंदे गटाची असल्याचं निरीक्षण नोंदवताच शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर, ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिल्लीतून सगळा कारभार सुरू असल्याचे म्हटले.

बुधवारी निकाल लागला अन् लगेचच प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत बोलताना नार्वेकरांवर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Maharashtra Politics | निकाल लागला! जुना फोो सुळेंची ठाकरेंसाठी बॅटिंग, कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

Maharashtra Politics | “भाजपच्या दिल्लीतील मालकांनी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Post Office RD scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायद्याची!

Bigg Boss 17 | अंकिता-विकीचं भांडण बाजूलाच, ‘सासूबाई’लाच सुनावले जातायेत खडेबोल