Maharashtra Politics | “भाजपच्या दिल्लीतील मालकांनी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Politics | बुधवारचा दिवस राज्यासह देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरला. शिवसेना आमदार अपात्रता आणि संतासंघर्षाचा निकाल अखेर जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणार अंतिम निकाल जाहीर केला. (Shiv sena MLA Disqualification Verdict Final result) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांनी सांगितलं अन् उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. शिंदे यांचा पक्षच मूळ शिवसेना असल्याचं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं. निकाल जाहीर होताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी देखील लोकशाहीची हत्या झाली असल्याचं म्हणत भाजपला लक्ष्य केलं.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत बोलताना नार्वेकरांवर बोचरी टीका केली. आता ‘सामना’तून शिंदेंसह भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ठाकरे गटानं सामनाच्या संपादकीयमधून सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचलेली निकालपत्राची प्रत ही भाजपच्या दिल्लीतील मालकांनी लिहिली असल्याचा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics अन् शिवसेना वाद प्रकरण

“महाराष्ट्रातील गद्दारांसंदर्भात निकाल ठरलेलाच होता. तसाच तो आला. धक्का बसावा असं त्यात काहीच नाही. विधानसभा अध्यक्षांनी वाचून दाखवलेलं प्रदीर्घ निकालपत्र हे त्यांच्या दिल्लीतील मालकांनी लिहून दिलेलं निकालपत्र आहे. एखाद्या विधिमंडळ पक्षात दोन गट पडले म्हणून त्या आधारावर त्या पक्षाची मालकी कोणाकडं हे ठरत नाही, पण भारताच्या निवडणूक आयोगानं त्याच आधारावर शिवसेनेची मालकी फुटीर गटाकडे सोपवली व आता त्याच चुकीच्या निकालावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले”, अशा शब्दांत नार्वेकरांच्या निरीक्षणावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आता विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले की, खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. विधानसभा अध्यक्ष हे कशाच्या आधारावर सांगतात? जिथे विधानसभा अध्यक्षच दिल्लीहून नेमले जातात व त्या घटनात्मक पदावरील व्यक्ती ही पाच वर्षांत चार पक्ष बदलून त्या पदावर बसते तेव्हा त्या व्यक्तीने शिवसेनेसारख्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे स्वामित्व ठरवावे हे धक्कादायक आहे, असंही सामना अग्रलेखात नमूद आहे.

“राजकीय अराजक निर्माण करणारा”

महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण करणारा व असत्याच्या गळ्यात मणिहार घालणारा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. भारतीय लोकशाहीचे विडंबन कसं ते पाहा. ज्या पक्षात आज शंभर टक्के हुकूमशाही, एकाधिकारशाही आहे त्या पक्षानं नेमलेलं विधानसभा अध्यक्ष शिवसेनेत लोकशाही नाही व शिवसेनेतील गद्दारांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांना नाही असं सांगतात, ही संसदीय लोकशाहीची आतापर्यंतची सगळ्यात मोठी थट्टा आहे. विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर याच विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही फुटीर शिंदे गटाची असल्याचा निकाल दिला, असंही संपादकीयमधून सांगण्यात आले.

राहुल नार्वेकरांचे निरीक्षण

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी बहुप्रतिक्षित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. मुख्यमंत्री शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्या आधी त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येत नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच दोन्ही गटाचे सर्वच आमदार पात्र असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Post Office RD scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायद्याची!

Bigg Boss 17 | अंकिता-विकीचं भांडण बाजूलाच, ‘सासूबाई’लाच सुनावले जातायेत खडेबोल

तनुश्री दत्ताचा Emraan Hashmi बाबत मोठा खुलासा!

Maharashtra Politics | सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, ठाकरेंना धक्का