Maharashtra Politics | सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, ठाकरेंना धक्का

Maharashtra Politics |  राज्याच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Politics) निकाल अखेर समोर आलाय. निकालात शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसले आहेत.   एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना (Shivsena) पक्ष आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाहीत. तसेच उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती ही अमान्य असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत. आधीच्या घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. पण पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहित धरता येत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

Maharashtra Politics | शिंदे गटाचे 16 आमदार पात्रच

शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं आहे. आमदार संपर्काबाहेर गेले होते, हा ठाकरे गटाचा युक्तिवाद मान्य होऊ शकत नाही. कारण कोणाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी प्रयत्न केला, याबद्दल ठाकरे गटाने कोणतेही पुरावे दिले नाहीत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणताही आधार नाही, असं नार्वेकरांनी म्हटलंय.

मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांना ठाकरे यांच्या सांगण्यावरून भेटायलाही गेले होते. हे ठाकरे गटाकडून कबूलही करण्यात येत आहे. शिंदे गटातील तीन साक्षीदार आमदारांनीही हे साक्षीमध्ये सांगितले. त्यामुळे आमदार संपर्काबाहेर गेले होते, हा युक्तिवाद अमान्य करण्यासाठी हा एक आणखी आधार आहे, असं अध्यक्षांनी सांगितलं.

पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरुन काढू शकत नाहीत, असं नार्वेकरांनी सांगितलं

शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाहीत. असं झालं तर पक्षातला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. नाहीतर पक्षातील छोटे घटक काहीच बोलू शकणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा स्वत:च्याच पायावर धोंडा?; ‘ती’ चूक पडली महागात

Shiv Sena MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना पहिला धक्का!

Shiv Sena MLA Disqualification LIVE | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचा जसाच्या तसा

Shiv Sena MLA Disqualification Case | निकाल विरोधात लागला तरी ठाकरेंचा प्लॅन बी तयार, अशी असणार योजना

Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!