Shiv Sena MLA Disqualification LIVE | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचा जसाच्या तसा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shiv Sena MLA Disqualification LIVE शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचं वाचन सुरु.

राहुल नार्वेकर यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल, निकाल वाचनाला सुरुवात

-निकाल वाचणाच्या सुरुवातीला मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, त्यांनी मला या प्रकरणात योग्य दिशादर्शन करण्याचं काम केलं, तसेच मी विधीमंडातील स्टाफ आणि दोन्ही गटांच्या वकिलांचे देखील आभार मानतो. विधानसभा अध्यक्षांत ज्या 34 याचिका दाखल झाल्या, त्यावर निकाल.

-सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय, त्यानंतर आमदार अपात्रतेबाबत निर्णय, Shiv Sena MLA Disqualification LIVE

-निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटांमध्ये मतभेद आहेत, ठाकरे गटाने केलेली घटना दुरुस्ती ही नियमबाह्य आहे. ठाकरेनी 2018 मध्ये दिलेली घटना चूक आहे

-1999 ची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावरील एकमेव घटना आहे, प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल, 2018 ची शिवसेनेची घटना स्वीकारता येणार नाही

-2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाणार

-दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली गेली, पण दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही. अखेर निवडणूक आयोगानं दिलेली घटनेची प्रत ग्राह्य धरली जाईल, Shiv Sena MLA Disqualification LIVE

-उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्याल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह तर शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरं आणि पुराव्यांशी सहमत आहेत. तसेच, शिवसेना नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं

-23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. पक्षात दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. Shiv Sena MLA Disqualification LIVE

-22 जून 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष या नात्यानं माझ्यासमोर आलेले मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत, शिवसेना कुणाची? याचं उत्तर पक्ष नेतृत्त्वाच्या निवड पद्धतीवर अवलंबून आहे, साल 2018 मधील नेतृत्त्व निवड ही पक्षाच्या घटनेला धरून होती हे प्रमाण मानायचं का? असा प्रश्न होता. पक्षप्रमुख की राष्ट्रीय कार्यकारणी प्रमुख महत्त्वाचा मानायचा हा कळीचा मुद्दा होता

-शिवसेना पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही. एकनाथ शिंदेंना पक्षातून काढून टाकण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही.

-2018 सालची पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. पक्षात बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो, पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल.

-एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे

निकालाची वैशिष्ट्य काय आहेत?

सहा गटांमध्ये हा निकाल वाचला जाणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून 6 गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं आहे. 6 गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि त्यानंतरच संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी हा निकाल एकनाथ शिंदे यांच्याच बाजूनं लागणार असल्याच्या बातम्या होत्या.  पुढील लिंकवर क्लिक करुन ती बातमी वाचा- Shiv Sena MLA Disqualification Case | एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागणार निकाल?, सर्वात मोठी माहिती आली समोर

News Title: shiv sena mla disqualification LIVE

महत्त्वाच्या बातम्या-

Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!

Maharashtra Politics | “ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार”, निकालाआधीच आलेल्या दाव्याने मोठी खळबळ

LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स

Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”