Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Narvekar |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन गट पडले. या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय वादळ आले होते. या बंडखोरीचा परिणाम म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मात्र, हे घटनेला धरून नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी याचिका केली होती. त्यावरच आधारित आमदार अपात्रतेच्या निर्णयाला अखेर आज मुहूर्त मिळाला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज (१० जानेवारी) दुपारी चार वाजता याचा निर्णय देणार आहेत. मात्र, त्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं असल्याचे म्हणत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या आरोपाला आता स्वतः राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

Rahul Narvekar काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी संजय राउत यांच्यावर टीका केली. “संजय राऊत हे काहीही बोलत असतात. आता उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नसतो. राऊतांयासारख्या लोकांना इग्नोर करणंच बेस्ट आहे.”, अशी जोरदार पलटवार राहुल नार्वेकर यांनी संजय राउत यांच्यावर केला आहे. तसेच, आजच्या निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. इतकं मी जनतेला आश्वासित करतो. मी सांगितल्याप्रमाणे कायद्याचं तंतोतंत पालन केलं जाईल. हा निकाल जनतेलाही मान्य असेल असाच राहणार असल्याचेही नार्वेकर म्हणाले आहेत.

आमदार अपात्रतेच्या निर्णयापूर्वी म्हणजेच काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आजचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येणार की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“गेल्या दीड वर्षांपासून राज्यात बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. जे निर्णय घेतले जात आहेत. त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे. त्यातच आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचं मॅचफिक्सिंग अगोदरच झालं आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. त्यालाच नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, आज सायंकाळी चार वाजता राहुल नार्वेकर या महत्वपूर्ण निकालाचे (MLA Disqualification Case) वाचन करणार आहेत. एकूण 500 पानांच्या निकाल पत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या निकालाकडेच असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

News Title- Rahul Narvekar  on Sanjay Raut 

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

Renault Kiger & Triber New Range 2024 l रेनॉल्ट इंडिया कंपनी पुढील 3 वर्षात सादर करणार हे 5 जबरदस्त व्हेरियंट!