Renault Kiger & Triber New Range 2024 l संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर रेनॉल्ट इंडिया या कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. रेनॉल्ट इंडिया कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन रेंज ऑफर केली आहे. कंपनीने नुकतंच आपल्या पुढील 3 वर्षांच्या व्हेरियंटचा खुलासा केला आहे. कंपनी पुढील 3 वर्षात 5 नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे. त्यामुळे आगामी काळात रेनॉल्ट इंडिया कंपनी ग्राहकांसाठी कोणत्या कार उपलब्ध करणार आहे ते समजणार आहे.
कंपनी हे 5 मॉडेल सादर करणार! :
पुढील 3 वर्षात रेनॉल्ट इंडिया कंपनी 5 नवीन मॉडेल सादर करणार आहे. यामध्ये 2 नेक्स्ट जनरेशन, 2 SUV आणि 1 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असणार आहे. पण आता कंपनीने सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही मॉडेल्सची नवीन श्रेणी सादर केली आहे, म्हणजे Kwid, Triber आणि Kiger.
कंपनीने या तिन्ही मॉडेल्समध्ये कोणतेही कॉस्मेटिक बदल केले नसले तरी कंपनीने या सर्व मॉडेल्समध्ये काही नवीन फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स जोडलेले आहेत.
Renault Kiger & Triber New Range 2024 l तसेच कंपनीने किगर आणि ट्रायबरमध्ये 15 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये आणि Kwid मध्ये 14 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत. तर या तिन्ही मॉडेल्समध्ये (Renault Kiger & Triber New Range 2024) कंपनी काय फीचर्स देणार आहे ते जाणून घेऊयात…
नवीन मॉडेलमध्ये कंपनी देणार हे सेफ्टी फीचर्स :
– इलेक्ट्रॉनिक स्थिरता
– आकर्षक नियंत्रण प्रणाली
– हिल स्टार्ट सहाय्य
– टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
– रियर सीट बेल्ट रिमाइंडर
तिन्ही मॉडेल्समध्ये कोणते इंजिन असणार! (Renault Kiger & Triber New Range Engine ) :
रेनॉ किगर तीन पॉवरट्रेनसह सादर (Renault Kiger & Triber New Range 2024) होणार आहे. यामध्ये 1.0 लीटर एनर्जी, 1.0 लीटर टर्बो आणि 1.0 लीटर टर्बो सीव्हीटी इंजिन असणार आहे. याशिवाय Kwid मध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे MT आणि AMT ट्रान्समिशनसह येते. ट्रायबर 1.0 लिटर MT आणि AMT ट्रान्समिशनसह देखील येते.
- महत्वाच्या घडामोडी :
Rohit Sharma ला खुनावतोय ‘विराट’ विक्रम; धोनीलाही मागं टाकण्याची सुवर्णसंधी
Online Electricity Bill l ग्राहकांनो…अशाप्रकारे घरबसल्या लाईटबिल भरा तेही अगदी काही मिनिटांत
Goa हत्याकांड! महिला CEO कडून पोटच्या मुलाची हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
Lakshadweep Island Tourism l निसर्गाचा मनमोहक आनंद घेयचा असेल तर लक्षद्वीप बेटाला भेट द्या!