Goa हत्याकांड! महिला CEO कडून पोटच्या मुलाची हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Goa | सोमवारी गोव्यातील एका घटनेने एकच खळबळ माजली. 39 वर्षीय महिलेने पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या चार वर्षांच्या मुलाच्या पोस्टमॉर्टम अहवालाचा हवाला देत एका वरिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी सांगितले की, मुलाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. आईच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल. एका स्टार्ट-अप कंपनीच्या 39 वर्षीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सूचना सेठने गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली.

Goa पोलिसांची मोठी कारवाई

पोटच्या मुलाची हत्या करून आरोपीने मृतदेह बॅगेत भरून शेजारच्या कर्नाटक राज्यात नेला. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गोवा पोलिसांनी आरोपी सूचना सेठ हिला सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली. तिला मंगळवारी गोव्यात आणण्यात आले असून म्हापसा शहरातील न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही महिला सहा जानेवारी रोजी मुलासह उत्तर गोव्यातील कँडोलीम येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये आली होती आणि दोन दिवस तिथे राहिल्यानंतर सोमवारी टॅक्सीने बंगळुरूला गेली. अपार्टमेंटच्या कर्मचार्‍यांनी नंतर पोलिसांना माहिती दिली आणि त्यांना सांगितले की जेव्हा ती निघून गेली तेव्हा तिचा चार वर्षांचा मुलगा तिच्यासोबत दिसला नाही.

गुदमरल्याने मुलाचा मृत्यू

प्रशासकीय अधिकारी डॉ कुमार नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चार वर्षाच्या मुलाचे तोंड आणि नाक दाबल्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा. गुदमरल्यामुळे चेहरा व छाती सुजली होती व नाकातून रक्त येत होते. त्यासाठी काही कापड किंवा उशीचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच मुलाचा हाताने गळा आवळून खून झाला असेल याची शक्यता कमी आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

गोवा पोलिसांनी मृत मुलाचे पोस्टमार्टम केले आहे. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी परवानगी दिल्यास मुलाचे वडील बुधवारी अंत्यसंस्कार करतील. तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी धक्कादायक खुलासा केल्याने धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान, शवविच्छेदनादरम्यान उघडे हात वापरल्याचे दिसून आले नाही. म्हणजेच पुरावे सापडू नये याची काळजी आरोपीने घेतली असल्याचे उघड झाले. मुलाची मान कशाने तरी दाबल्याचे दिसून आले. मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले.

Lakshadweep Island Tourism l निसर्गाचा मनमोहक आनंद घेयचा असेल तर लक्षद्वीप बेटाला भेट द्या!

Mohammed shami | “PM मोदी आपल्या देशाला…”, मालदीव वादावर शमीचं मोठं विधान

Ram Mandir Inauguration | उत्तर प्रदेश सरकारची विशेष तयारी; CM योगींची मोठी घोषणा

Animal Movie | महिलांवरील अत्याचार दाखवणारेच चित्रपट लोकांना आवडतात; कंगनाचा संताप

Team India ला पुन्हा अपयश! ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम; पाहुण्यांचा गोड शेवट