Lakshadweep Island Tourism l निसर्गाचा मनमोहक आनंद घेयचा असेल तर लक्षद्वीप बेटाला भेट द्या!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lakshadweep Island Tourism l नवीन वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप हा पहिला दौरा केला. यावेळी त्यांनी लक्षद्वीपचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी त्यांनी समुद्राखालील जीवनाचा शोध घेण्यासाठी ‘स्नॉर्कलिंग’चा आनंद लुटला. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही फोटो पोस्ट केले आहेत. पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर तुम्हीही लक्षद्वीप बेटला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कोणकोणत्या गोष्टींचा तुम्हाला आनंद घेता येईल ते पाहुयात…

अगत्ती बेट (Agatti Airport ) :

लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील अगत्ती बेट सर्वात सुंदर बेट व शहर आहे. हे बेट कोचीपासून 459 किमी दूर समुद्रात आहे. या बेटाच्या चारही बाजू समुद्राने वेढलेल्या आहेत. पाण्याच्या मध्यभागी असलेले हे बेट त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

अगत्ती बेटावर जाण्यासाठीचा रस्ता हा नारळ आणि ताडाच्या झाडांमधून जातो. तेथील जमीन प्रवाळांनी तयार केली आहे. हे स्नॉर्कलिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. ‘स्नॉर्कलिंग’मध्ये लोक समुद्राच्या पृष्ठभागावर पोहतात आणि त्याखालील सागरी जीवनाचा शोध घेतात.

मिनिकॉय आणि बंगाराम बेट (Minicoy and Bangaram Island) :

Lakshadweep Island Tourism l मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. हे कोचीच्या समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 400 किमी अंतरावर आहे. याला स्थानिक भाषेत मलिकू असेही म्हणतात. येथे तुम्हाला अरबी समुद्राचे स्वच्छ आणि निळे पाणी पाहायला मिळेल.

Lakshadweep Tourism l या बेटावर प्रवाळ खडक आणि पांढरी वाळू देखील आहे. याशिवाय तुम्ही बंगाराम बेटालाही भेट देऊ शकता. हे हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे तुम्ही जलक्रीडा आणि साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता.

कावरत्ती बेट (Kavaratti Island) :

लक्षद्वीपची राजधानी असलेले कावरत्ती बेट हे सुंदर बेट आणि पांढऱ्या वाळूसाठी ओळखले जाते. याशिवाय काल्पेनी बेट किंवा कोइफनी बेटावर तुम्ही नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

कावरत्ती हे बेट चेरियाम, पिट्टी आणि तिलककम या तीन बेटांचे बनलेले आहे. येथे तुम्ही कोरल रीफ, कयाकिंग, स्नॉर्कलिंग, कॅनोइंग आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

महत्वाच्या घडामोडी :

Mohammed shami | “PM मोदी आपल्या देशाला…”, मालदीव वादावर शमीचं मोठं विधान

Ram Mandir Inauguration | उत्तर प्रदेश सरकारची विशेष तयारी; CM योगींची मोठी घोषणा

Animal Movie | महिलांवरील अत्याचार दाखवणारेच चित्रपट लोकांना आवडतात; कंगनाचा संताप

Team India ला पुन्हा अपयश! ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम; पाहुण्यांचा गोड शेवट

Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान; ‘लेका’चा गौरव अन् आईचे डोळे पाणावले