Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान; ‘लेका’चा गौरव अन् आईचे डोळे पाणावले

Mohammed Shami | भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शमीने हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यात मोहम्मद शमी आपल्या आईसोबत पोहोचला होता. आपल्या मुलाचा गौरव होत असल्याचे पाहून शमीच्या आईचे डोळे पाणावल्याचे दिसले. मोहम्मद शमी जेव्हा राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याची आई त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली.

मोहम्मद शमीच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शमीने शमीने एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स (24) घेतल्या होत्या. त्यानंतर BCCI ने अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस केली आणि मोहम्मद शमीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मंगळवारी राष्ट्रपती भवनात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान

अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्या नावाची घोषणा होताच कॅमेरा मोहम्मद शमीच्या आईकडेही गेला आणि त्याची आई अंजुम आरा आपल्या मुलाकडे एकटक पाहताना दिसली. लेकाचा गौरव होत असताना माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. शमीच्या आईचा हा व्हिडीओ सर्वांनाच भुरळ घालत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शमीने चाहत्यांसह सर्वांचे आभार मानले.

अर्जुन पुरस्कार जिंकणे हे म्हणजे एक स्वप्न गाठण्यासारखे आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या देशाला अभिमान वाटावा यासाठी मी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. इतर अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे देखील अभिनंदन, असे शमीने सांगितले.

 

शमीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, “आज मला खूप अभिमान वाटतो की मला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यात खूप मदत केली आणि माझ्या चढ-उतारात मला नेहमीच साथ दिली. माझे प्रशिक्षक, बीसीसीआय, सहकारी, माझे कुटुंब, कर्मचारी आणि माझे चाहते यांचे खूप खूप आभार. माझी मेहनत ओळखली आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.”

 

शमी क्रिकेटपासून दूर

भारताचा प्रमुख गोलंदाज सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्याला देखील मुकला होता. भारतीय संघाला आगामी काळात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची असून, शमी दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याच्या नावावर 64 कसोटी सामन्यांमध्ये 229 बळींची नोंद आहे.

Jackie Shroff | राम मंदिर उद्धाटनावर जॅकी श्रॉफ यांची पोस्ट, म्हणाले…

Sharad Mohol च्या हत्येबाबत सर्वात मोठी माहिती समोर, ‘या’ दोन व्यक्तींनी दिली आरोपींना साथ

Compact Powder वापर असाल तर ही बातमी नक्की वाचा!

‘…म्हणून मी आडनाव बदलून टाकलं ‘; Pankaj Tripathi यांचा मोठा खुलासा!

Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे’; बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप