Jackie Shroff | राम मंदिर उद्धाटनावर जॅकी श्रॉफ यांची पोस्ट, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jackie Shroff | येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराचं उद्धाटन (inauguration of Ram Mandir ) होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यात बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. त्यात आता प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचेही नाव सामील झाले आहे. ‘राम मंदिराच्या उद्धाटन प्रसंगी उपस्थित राहणं हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी आमंत्रण मिळाल्यानंतर दिली.

जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि त्याचे कुटुंब देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहेत. याबाबत त्यांनी ट्वीटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उद्धाटनसाठी देशभरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jackie Shroff यांची पोस्ट

22 जानेवारीला अयोध्येतील अत्यंत शुभ श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्यात मी अत्यंत धन्यता मानत आहे. आपल्या भारतीयांच्या जीवनात हा ऐतिहासिक दिवस आणण्यासाठी अनेक दशकांपासून सहभागी असलेल्या आणि योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार, अशी पोस्ट जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी केली आहे.

यासोबतच जॅकी श्रॉफ यांनी आरएसएस RSS, सुनील आंबेकर, अजय मुडपे आणि त्यांचे प्रिय मित्र महावीर जैन यांनी घरी येऊन हे शुभ आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. या भेटीचे फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफदेखील दिसून येत आहे.

‘या’ कलाकरांनाही मिळालं उद्धाटनाचं आमंत्रण

अयोध्येत पार पडणाऱ्या श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटीही आपली उपस्थिती नोंदवणार आहेत. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणदीप हुड्डा, कंगना रणौत आणि सोनू निगम यासारख्या स्टार्सचा सहभाग असणार आहे. त्यात आता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचाही समावेश झाला आहे.

मंदिराच्या उद्धाटन प्रसंगाचं आमंत्रण देण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. सोहळ्यासाठी आतापासूनच अयोध्येत कडक बंदोबस्त करण्यात येत आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हणत सर्व देशवासीयांनी या क्षणाचे साक्षीदार बनण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशवासीयांकडून या दिवसाची आतुरतेने वाट पहिली जात आहे.

News Title- Jackie Shroff invited to Ram Mandir inauguration

महत्त्वाच्या बातम्या- 

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा