Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Uddhav Thackeray | शिवसेना अपात्रता प्रकरणावर बुधवारी निकाल येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः यासंदर्भातील निकाल वाचतील. कुणाचे आमदार अपात्र होणार एकनाथ शिंदे यांचे की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे…? शिवसेनेच्या ‘त्या’ 16 आमदाराचं काय होणार याचा पुढच्या 48 तासांत फैसला होणार आहे. पण याआधीच ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा झटका बसलाय.

Uddhav Thackeray | ठाकरे गटाला मोठा झटका

ठाकरे गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने (Ed Raid) मंगळवारी छापा टाकला आहे. ईडीचे दहा ते बारा अधिकारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहोचले.

ठाकरे गटाचे बारा आमदार प्रकरणाचा उद्या निकाल आहे. त्यापूर्वी ईडीची छापे सुरु झाले आहे. रवींद्र वायकर यांच्याकडे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात छापे पडले होते. आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस दिली होती.

मुंबईत आमदार रवींद्र वायकर यांच्यावर सुरु झालेल्या ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईनंतर रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीने रवींद्र वायकर यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबई मनपाच्या जागेवर बांधलेल्या हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोपी त्यांच्यावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा

Ather 450 Apex Vs OLA S1 Pro l देशात इलेक्ट्रिक स्कूटरला मागणी! या दोन स्कुटर एकमेकांशी करतील स्पर्धा

Maldives India | पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं भारताला समर्थन; एका शब्दाची पोस्ट Viral

MLA Disqualification Case l आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!