Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा

Indian Railway Ticket Booking l प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर रेल्वेने प्रवास करायला सर्वांनाच आवडतो. त्यामुळे प्रवाशी रेल्वेने प्रवास करण्याला जास्त प्राधान्य देतात. मात्र रेल्वेने प्रवास करण्याआधी तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर तासनतास रांगेत उभे राहावे लागते. पण, बदलत्या काळानुसार रेल्वेनेही नव्या तंत्रज्ञानाशी हातमिळवणी केली. तर रेल्वेचं तिकीट घरबसल्या कशाप्रकारे काढायचं हे जाणून घेऊयात…

रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी :

आता बहुतेक लोक रेल्वे तिकीट बुकिंगसाठी (Indian Railway Ticket Booking) ऑनलाइन माध्यम निवडतात. रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात.

इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांचा मागोवा घेण्यासाठी आणि तिकीट बुक (Indian Railway Ticket Booking) करण्यासाठी तुम्ही IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) अॅप वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (Indian Railway Ticket Booking) जाऊन नोंदणी करावी लागेल. यानंत, तुम्ही काही सोप्या स्टेप्सद्वारे ऑनलाइन बुकिंग करू शकता.

Indian Railway Ticket Booking l घरबसल्या IRCTC मध्ये नोंदणी करण्याची पद्धत :

– रेल्वे तिकीट घरबसल्या काढण्यासाठी सर्वात प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctc.co.in ला भेट द्या.
– यानंतर Register या पर्यायावर क्लिक करा. (Indian Railway Ticket Booking)
– यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे तुम्हाला नाव, लिंग, जन्मतारीख इत्यादी तपशील असतील ते सामाविषय करा.
– पुढे आपले वापरकर्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
– यानंतर तुम्हाला विचारलेल्या सुरक्षा प्रश्नांची उत्तरे भरा.

– पुढे ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि लॉगिन पासवर्ड टाका.
– यानंतर तुमचा पत्ता आणि पिन कोड टाका.
– तिथे दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा. यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.
– शेवटी नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
– यानंतर तुमचा IRCTC आयडी तयार होईल.

घरबसल्या IRCTC मध्ये बुकिंग करण्याची पद्धत :

– सर्वात प्रथम वेबसाइटवर जा किंवा अॅपवर लॉग इन करावे.
– त्यानंतर बुक युवर तिकीट या पर्यायावर क्लिक करा.
– पुढे बोर्डिंग आणि डेस्टिनेशन एड्रेस भरा.
– तुमची प्रवासाची तारीख निवडा.
– प्रवासी वर्ग निवडा.
– यानंतर ट्रेनचा पर्याय निवडा.

– Book Now पर्यायावर क्लिक करा.
– प्रवासी तपशील भरा.
– पुढे मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
– यानंतर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI इत्यादीद्वारे ऑनलाइन मोडमध्ये तिकीट बुकिंगसाठी पेमेंट करा. तुमचे तिकीट बुक केले जाईल आणि त्याचा संदेश तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पाठवला जाईल.

महत्वाच्या घडामोडी :

Ather 450 Apex Vs OLA S1 Pro l देशात इलेक्ट्रिक स्कूटरला मागणी! या दोन स्कुटर एकमेकांशी करतील स्पर्धा

Maldives India | पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं भारताला समर्थन; एका शब्दाची पोस्ट Viral

MLA Disqualification Case l आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

Football विश्वावर शोककळा! दोनदा जगज्जेता राहिलेल्या महान जर्मन खेळाडूचे निधन

Kangana Ranaut लोकसभा निवडणूक लढवणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा