Kangana Ranaut लोकसभा निवडणूक लढवणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. कंगना राजकारणात येणार का अशी चर्चा मागील काही कालावधीपासून सुरू आहे. राजकीय नेत्यांनाही भिडणाऱ्या कंगनाला असाच प्रश्न एका चाहत्याने केला असता अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. अलीकडेच एका महिला चाहत्याच्या कमेंटवर व्यक्त होताना कंगनाने राजकीय खेळीबद्दल भाष्य केले होते.

कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अलीकडेच एका महिला चाहत्याच्या पोस्टला उत्तर देताना कंगनाने लिहिले की, ती तिच्या करिअरमध्ये बदल घडवून आणण्याचा विचार करत आहे. येत्या काही वर्षात काही चांगले काम करण्याचा विचार आहे. त्यामुळे अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात होती.

Kangana Ranaut चा खुलासा

मात्र, आता खुद्द कंगनाने याबद्दल भाष्य केले असून राजकारणात यायचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे. कंगना तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नेहमी काही ना काही पोस्ट करत असते. निमल चित्रपटातील संवादावर आक्षेप घेत तिने चित्रपटाचे वर्णन महिलांवरील अत्याचार असे केले. कंगनाच्या एका महिला चाहत्याने तिच्या तेजस चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट केली होती. यावर ‘तेजस’ हा खूप चांगला चित्रपट असून सर्वांनीच पाहायला हवा असे कंगनाने म्हटले होते.

Kangana Ranaut चा करिअर प्लान काय?

दरम्यान, आता एका चाहत्याने राजकारणाबद्दल प्रश्न केला. “करिअर राजकारणाकडे वळवण्याचा विचार आहे वाटतं. ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे असं आम्ही समजायचं का?”, चाहत्याच्या या प्रश्नावर व्यक्त होताना कंगनाने म्हटले, “नाही नाही, कृपया मी रेस्टॉरंट व्यवसायातही उतरत आहे असा विचार करू नका… राजकारण हा व्यवसाय नाही तर ही एक लोकसेवा आहे.”

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधताना कंगनाने निमल चित्रपटावरून संताप व्यक्त केला. तिने सांगितले की, प्रेक्षकांना असे चित्रपट आवडतात ज्यात महिलांवरील अत्याचार दाखवले जातात. यादरम्यान अभिनेत्रीने करण जोहरवर देखील निशाणा साधला. कंगनाने करिअर बदलण्याचे संकेतही दिले असून आगामी काळात तिला तिच्या करिअरमध्ये काहीतरी चांगले करायचे असल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, कंगना रनौत राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. मागील काही काळापासून तिने अनेकदा सत्ताधारी भाजपाच्या बाजूने भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. कोरोना काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकासोबत देखील कंगनाचा चांगलाच वाद झाला होता.

IPL 2024 गाजवण्यासाठी Hardik Pandya सज्ज; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा Video Viral

Rohit Sharma आणि Virat नाही! लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडेल? दिग्गजानं सांगितलं नाव

Arjuna Award | “लोकांचं सगळं आयुष्य जातं पण…”, पुरस्कार जिंकताच शमी भावूक

Team India | सगळेच प्यायचे पण नाव माझं बदनाम झालं; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

Devara Part-1 Teaser Release | Junior NTR चे खतरनाक अ‍ॅक्शन सिन्स; ‘या’ दिवशी रिलीज होणार Devara