Arjuna Award | “लोकांचं सगळं आयुष्य जातं पण…”, पुरस्कार जिंकताच शमी भावूक

Arjuna Award | भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वन डे विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघासाठी काळ ठरला. पहिल्या काही सामन्यांमध्ये संधीच्या शोधात असलेल्या शमीने संधी मिळताच आपल्या सलामीच्या सामन्यात ‘पंजा’ मारला. पाच बळी घेऊन त्याने जोरदार सुरूवात केली. शमीचा हा सिलसिला संपूर्ण स्पर्धेत कायम राहिला आणि तो सर्वाधिक बळी घेणारा शिलेदार ठरला. अलीकडेच मोहम्मद शमीने नामांकित अर्जुन पुरस्कार जिंकला. मोहम्मद शमीने अर्जुन पुरस्कार जिंकल्यानंतर प्रथमच याबद्दल भाष्य केले आहे.

Arjuna Award देऊन 26 खेळाडूंना सन्मानित करणार

भारताचे राष्ट्रपती 9 जानेवारीला मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. अलीकडेच क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले होते. शमीशिवाय 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अर्जुन पुरस्कार जिंकल्यानंतर शमीने पहिल्यांदाच याबाबत भाष्य केले. शमी म्हणाला की, हा पुरस्कार जिंकला, हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. लोक आपले संपूर्ण आयुष्य घालवतात, परंतु हा पुरस्कार जिंकू शकत नाहीत. अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस झाली याचा मला आनंद आहे. तो ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होता.

तसेच यावेळी शमीने दुखापतीबद्दल देखील भाष्य केले. तो दुखापतीच्या कारणास्तव दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकला. आगामी काळात होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत देखील तो नसणार असल्याचे कळते. “दुखापत हा एक खेळाचा भाग आहे. चाहत्यांचे प्रेम खूप महत्त्वाचे असते. आम्ही आमचं बेस्ट देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मला आशा आहे की, मी लवकरच पुनरागमन करेन”, असे शमीने सांगितले.

Mohammed Shami ने वर्ल्ड कप गाजवला

मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकात मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. मोहम्मद शमीने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 7 सामन्यांत 24 विरोधी फलंदाजांना तंबूत पाठवण्याची किमया शमीने साधली. भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात शमीचा मोठा हात होता. मात्र, विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तर चिराग शेट्टी (बॅडमिंटन) आणि सात्विकसाईराज रँकी रेड्डी (बॅडमिंटन) यांचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान केला जाईल.

Team India | सगळेच प्यायचे पण नाव माझं बदनाम झालं; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

Devara Part-1 Teaser Release | Junior NTR चे खतरनाक अ‍ॅक्शन सिन्स; ‘या’ दिवशी रिलीज होणार Devara

TIGER 3 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, आता…

Nayanthara | अभिनेत्री नयनतारा मोठ्या अडचणीत?; नव्या वादाला तोंड फुटणार

Sharad Mohol | “खचून जाऊ नका, तर…”, शरद मोहोळच्या कार्यकर्त्यांना नितेश राणेंचा मोठा सल्ला