Rohit Sharma आणि Virat नाही! लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडेल? दिग्गजानं सांगितलं नाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma । कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ब्रायन लाराची ओळख आहे. एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम देखील त्याच्या नावावर आहे. अद्याप हा विक्रम मोडण्यात कोणत्याच खेळाडूला यश आले नाही. मात्र, अलीकडेच खुद्द ब्रायन लाराने शुबमन गिलचे कौतुक करताना तो हा विक्रम मोडू शकतो असा विश्वास व्यक्त केला होता. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार मायकेल क्लार्कने एक मोठा दावा केला आहे. खरं तर लाराचा विक्रम मोडण्याची क्षमता स्टीव्ह स्मिथमध्ये असल्याचे क्लार्कने नमूद केले.

Rohit Sharma नाही तर…

स्टीव्ह स्मिथ म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील मोठं नाव… स्मिथच्या खेळीला दाद देताना क्लार्कने सांगितले की, स्मिथने सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेट खेळल्यास त्याच्यासह संघालाही मदत होईल. मला तर वाटते की, त्याने केवळ 12 महिने सलामीला फलंदाजी केली तर तो अव्वल क्रमांकावर येईल.

असेही ऑस्ट्रेलियन संघाला आता चांगल्या सलामीवीराची गरज आहे. कारण अलीकडेच डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही जागा रिक्त आहे आणि स्मिथ आजतागायत कधीच सलामीवीर म्हणून कसोटीमध्ये दिसला नाही, असेही क्लार्कने नमूद केले.

… स्मिथ लाराचा विक्रम मोडेल – क्लार्क

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने स्टीव्ह स्मिथबद्दल मोठी भविष्यवाणी केली. स्टीव्ह स्मिथने कसोटीत सलामीवीर म्हणून प्रयत्न करायला हवा, असे क्लार्कने म्हटले आहे. असे झाल्यास तो पुढच्या 12 महिन्यांत नंबर-1 फलंदाज बनू शकतो आणि त्याने ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील 400 धावांचा विक्रम मोडल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे त्याने सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघातील प्रभावी सलामीवीराची जागा आताच्या घडीला रिक्त आहे. मात्र, स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत एकदाही कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून प्रतिनिधित्व केले नाही. अशा परिस्थितीत क्लार्कने संघ व्यवस्थापनाला विशेष सल्ला दिला आहे. तो ‘अराउंड द विकेट’ पॉडकास्टमध्ये बोलत होता.

ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल क्लार्क सध्या समालोचनाचे कार्य करतो. त्याने 2015 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून दिला आणि पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. तो त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. कांगारूच्या संघाने वन डे विश्वचषक 2023 देखील आपल्या नावावर केला आणि सहाव्यांदा किताब जिंकण्याची किमया साधली.

Arjuna Award | “लोकांचं सगळं आयुष्य जातं पण…”, पुरस्कार जिंकताच शमी भावूक

Team India | सगळेच प्यायचे पण नाव माझं बदनाम झालं; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

Devara Part-1 Teaser Release | Junior NTR चे खतरनाक अ‍ॅक्शन सिन्स; ‘या’ दिवशी रिलीज होणार Devara

TIGER 3 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, आता…

Nayanthara | अभिनेत्री नयनतारा मोठ्या अडचणीत?; नव्या वादाला तोंड फुटणार