IPL 2024 गाजवण्यासाठी Hardik Pandya सज्ज; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा Video Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 । भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पांड्याला वन डे विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. तो तंदुरूस्त नसल्यामुळे अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेचा भाग होऊ शकला नाही. हार्दिक पांड्याला एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान एका सामन्यात दुखापत झाली होती, त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची देखील मालिका खेळू शकला नाही.

अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तब्बल 14 महिन्यांनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे ट्वेंटी-20 संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना दुखापतीमुळे आगामी मालिकेतून वगळण्यात आले.

IPL 2024 गाजवण्यासाठी Hardik Pandya सज्ज

दरम्यान, हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या नवनिर्वाचित कर्णधाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हार्दिक आता थेट आयपीएल 2024 मध्ये दिसणार आहे. कारण अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे.

 

जोरदार पुनरागमन करण्यासाठी हार्दिक जिममध्ये खूप मेहनत घेत असल्याचे दिसते. हार्दिकच्या या व्हिडीओवर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहते हार्दिक लवकरात लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत, तर काही लोक आपला राग हार्दिकवर काढत आहेत. खरं तर रोहित शर्माला वगळून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

Rohit Sharma आणि Virat Kohli ची एन्ट्री

मागील ट्वेंटी-20 विश्वचषकापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून दूर होते. मात्र, दोन्हीही स्टार खेळाडू अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत.

अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मुकेश यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

Rohit Sharma आणि Virat नाही! लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडेल? दिग्गजानं सांगितलं नाव

Arjuna Award | “लोकांचं सगळं आयुष्य जातं पण…”, पुरस्कार जिंकताच शमी भावूक

Team India | सगळेच प्यायचे पण नाव माझं बदनाम झालं; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

Devara Part-1 Teaser Release | Junior NTR चे खतरनाक अ‍ॅक्शन सिन्स; ‘या’ दिवशी रिलीज होणार Devara

TIGER 3 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, आता…