TIGER 3 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, आता…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TIGER 3 | सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा अधिक गल्ला कमवला आहे. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. स्वतः सलमानने याबाबत माहिती दिली आहे.

‘टायगर 3’ (TIGER 3) हा यशराज स्पाई यूनिवर्सचा पाचवा चित्रपट आहे. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, यानंतर ‘टायगर 3’ मध्ये सलमान खान आणि कॅटरीना कैफ मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसून आले. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा याने केलं होतं.

‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार ‘TIGER 3’

यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली आहे. त्यानुसार टायगर 3 (TIGER 3) चित्रपट प्रेक्षकांना ॲमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे. या अॅक्शन चित्रपटात सलमान खान, कॅटरीना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसून आले होते. 2023 मध्ये दिवाळीत हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

भारतात टायगर 3 ने 339.50 कोटी रुपये आणि जगभरात 464 कोटी रुपयांची कमाई केली होती. टायगर 3 ला प्रचंड यश मिळवून दिल्याबद्दल सलमानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आणि म्हणाले आहे. “माझे दोन सर्वात प्रिय पात्र प्रेम आणि टायगरने दिवाळीत लोकांचे इतके मनोरंजन केले हे खूपच आश्चर्यकारक आहे. एक अभिनेता म्हणून मी फक्त माझ्या सिनेमाच्या ब्रँडद्वारे लोकांसाठी आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी भाग्यवान आहे की त्यांनी माझ्यावर प्रेम केले आहे.”, असे सलमान खान म्हणाला.

सलमान-कॅटरीनाचे आगामी चित्रपट

टायगर 3 (TIGER 3) च्या यशानंतर लवकरच सलमान कभी ईद कभी दिवाली, इंशाल्लाह, किक 2 तसेच दबंग 4 चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे अभिनेत्री कॅटरीना कैफ विजय सेतुपती सोबत ‘मेरी क्रिसमस’ मध्ये झळकणार आहे.

येत्या 12 जानेवारीला ‘मेरी क्रिसमस’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर देखील दिसणार आहेत. श्रीराम राघवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कॅटरीनाच्या चाहत्यांकडून चित्रपटाची आतुरतेने वाट पहिली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News | शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती उघडकीस!

Aishawarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत मोठी बातमी समोर!

Ajit Pawar | सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक, अजित पवार म्हणाले ‘असली नौटंकी आवडत नाही’

Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला

Golden Globe Awards 2024 l गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर!

News Title- Tiger 3 release on OTT