Pune News | शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती उघडकीस!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुणे येथील कोथरुड परिसरात भरदिवसा हत्या झाली. शरदवर एकाच वेळेस तीन गोळ्या खालून त्याला मारण्यात आलं. घडलेल्या प्रकारानंतर संपूर्ण पुणे हादरलं होतं. या मागे कोणाचा हात होता याचा पुणे पोलिसांनी शोध सुरु करताच अवघ्या 8 तासातच मुख्य आरोपींना पकडून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर शरद मोहोळबाबत दिवसेंदिवस रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत.

शरदला मारण्याचा प्लॅन आधीच झालेला

शरद मोहोळच्या हत्यानंतर पुण्यात (Pune News) दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पुण्याच्या गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसा गोळीबार झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सध्या शरदच्या हत्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शरदला मारण्याचा प्लॅन अचानक झालेला नव्हता. एका महिन्या आधीपासून शरदचा गेम करायचा असा कट रचण्यात आला होता. शिवाय शरदला त्याच्या जवळच्याच लोकांनी मारल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला.

जवळच्या व्यक्तीकडून शरदची हत्या

शरदची हत्या करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून शरदच्या जवळचा माणूस होता. त्याच्या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते आणि याचा शरद मोहोळला जरासुद्धा याचा सुगावा लागला नाही. शरद मोहोळ याचा खून करणारी त्याच्याच जवळची होती हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

हत्येमागचं कारण समोर-

शरदची हत्या करणारा मुख्य आरोपी त्याच्या जवळचा आणि ओळखीचा होता. आरोपी शरदच्याच परिसरातील होता. दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचं भांडण झालं होतं. त्यावेळी आरोपी लहान होता. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. त्याचाच राग आरोपीच्या मनात धुमसत होता.

शरदची हत्या करण्यात आली तेव्हा शरदच्या लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या घरातून जेवून बाहेर निघत असताना आरोपीने मागून येऊन शरदवर घराजवळच गोळ्या झाडल्या.

News Title : pune news big update about sharad mohol murder

महत्त्वाच्या बातम्या-

Aishawarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत मोठी बातमी समोर!

Ajit Pawar | सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक, अजित पवार म्हणाले ‘असली नौटंकी आवडत नाही’

Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला

Golden Globe Awards 2024 l गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर!

Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!