Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora )आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आपल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत होत्या. दोन महिन्यांपासून ते एकमेकांपासून दूर राहत असल्याचंही म्हटलं गेलं.
मलायकाचा एक्स नवरा अरबाजने काही दिवसांपूर्वीच शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. अरबाजच्या लग्नात मलायकाचा मोठा मुलगाही सामील झाला होता. तर अरबाजच्या लग्नानंतर मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावले गेले. अशातच मलायकाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या सर्व चर्चांवर पाणी फेरलं आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही एन्जॉय करताना दिसून येत आहेत.
Malaika Arora ची पोस्ट चर्चेत
मलायकाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत अर्जुन कपूर सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अर्जुन सोबत अभिनेता रणवीर सिंहही दिसून येत आहे. दोघेही डीजे बनून मस्ती करत आहेत. हा व्हिडीओ मलायका आणि अर्जुन यांच्या मित्राच्या लग्नातील असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओमध्ये तीने अर्जुनला ‘कुल’ म्हटले आहे.
मलायकाने (Malaika Arora) हा व्हिडिओ शेअर करत अजूनही ती अर्जुनच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे. दोघे लव्ह बर्ड्स गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानशी वेगळं झाल्यानंतर एका वर्षातच मलायकाने अर्जुनशी प्रेमाची गाठ बांधली. दोघांमध्ये तब्बल 12 वर्चांचा फरक असल्याने बऱ्याचदा दोघांना ट्रोलही करण्यात आलं.
Malaika आणि अर्जुनचं भांडण?
दोन महिन्यांपूर्वी मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं म्हटलं जातं. या कारणामुळेच दोघांनी एकमेकांना स्पेस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर त्यांच्यात सगळ काही नीट झाल्याने ते पुन्हा एकत्र आले आहेत. दोघांत लग्नाच्या निर्णयावरून बिनसल्याचंही म्हटलं गेलं. मात्र, अर्जुनने योग्य वेळ आली की लग्नाचा निर्णय घेऊ असं म्हटलं होतं.
त्यातच ‘झलक दिखला जा 10’च्या मंचावर फराह खाननेही मलायकाला (Malaika Arora) विचारलं होतं की ती 2024 मध्ये पुन्हा लग्न करण्याचा विचार करतेय काय? यावर मलाइकाने “माझ्या आयुष्यात कोणी असेल तर मी त्याच्याशी लग्न करेन. कुणी मला लग्नाची मागणी घातली तर मी लगेच लग्न करेल”, असं म्हटलं होतं.
News Title- Malaika Arora and Arjun Kapoor together
महत्वाच्या बातम्या-
Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम
Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू
Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’
Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत