Maldives India Issue | “मालदीव सरकारने भारताची माफी मागावी”; ‘हा’ देश आला भारताच्या समर्थनार्थ पुढे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maldives India Issue | मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेर्पाह विधानामुळे वाद चिघळला आहे. भारतीयांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मालदीव सरकारने आपल्या तीन मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई केली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव सरकारच्या मंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला. मालदीवच्या ज्या नेत्यांनी टिप्पणी केली त्यांचा देशभरातून निषेध होत आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील या प्रकरणी भारताला पाठिंबा दिला आहे.

भारतीयांना कमी लेखणाऱ्या मालदीव सरकारमधील मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी अनेक भारतीयांनी मालदीवला भेट देण्याचा आपला प्लान रद्द केला. तर अनेकांनी आपल्या देशातील पर्यटन उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मालदीवच्या मंत्र्यांच्या विधानाबद्दल बोलताना बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताला पाठिंबा दिला.

Maldives India Issue बांग्लादेश भारताला पाठिंबा

पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, भारत हा आमचा विश्वासू मित्र आहे. भारताने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला आहे. आमच्या मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी आम्हाला हवी ती मदत केली आणि साथ दिली. आम्ही आमची संपूर्ण कुटुंबे गमावली तेव्हा भारतानेच तर आम्हाला आश्रय दिला होता. आमच्या शुभेच्छा भारतातील लोकांसोबत कायम आहेत.

नेमकं प्रकरण काय?

2 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या त्यांच्या भेटीचे फोटो शेअर केले होते, ज्यात त्यांच्या स्नॉर्कलिंगच्या फोटोंचा देखील समावेश होता. फोटो शेअर करताना मोदींनी लिहिले की, ज्यांना पर्यटन, साहस आवडते त्यांनी त्यांच्या यादीत लक्षद्वीपचा समावेश करावा. मोदींच्या या फोटोंवर व्यक्त होताना मालदीवच्या माजी मंत्री शिउना यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती. मात्र, नंतर त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली.

“मालदीव सरकारने भारताची माफी मागावी”

मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद चिघळला आहे. मालदीव सरकारने संबंधित मंत्र्यांना निलंबित केले असले तरी आता माफीची मागणी होत आहे. अशातच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मालदीवच्या खासदार इवा अब्दुल्ला यांनी सांगितले की, मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांच्या टिप्पण्यांपासून स्वतःला दूर केले आहे आणि त्यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु, मालदीव सरकारने औपचारिकपणे भारतीय लोकांची माफी मागायला हवी असे मला वाटते.

“मंत्र्यांची टिप्पणी अत्यंत लज्जास्पद, वर्णद्वेषी आणि राग आणणारी आहे. मंत्र्यांचे म्हणणे मालदीवच्या लोकांच्या मतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मालदीव भारतावर किती अवलंबून आहे हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा भारत नेहमीच आमच्या मदतीला धावला आहे”, असेही मालदीवमधील खासदार इवा अब्दुल्ला यांनी नमूद केले.

Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत

IND vs AFG T20 Squad l अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! या खेळाडूवर सोपवली संघाची धुरा

Boycott Maldives Hashtag l मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर Boycott Maldives हा हॅशटॅग ट्रेंड; यामागचे नेमके कारण काय?

Team India | अखेर ट्वेंटी-20 संघात रोहित-विराटची एन्ट्री; वर्ल्ड कपची तयारी सुरू?

Team India ची विजयी सलामी पण पाहुण्यांच कमबॅक; दुसऱ्या सामन्यात भारत चीतपट