Boycott Maldives Hashtag l मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर Boycott Maldives हा हॅशटॅग ट्रेंड; यामागचे नेमके कारण काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Boycott Maldives Hashtag l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काहीदिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती. यावेळी लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले पंतप्रधान मोदींचे फोटो हे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आणि यानंतर सर्वत्र या फोटोंची आणि लक्षद्वीपची चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. या चर्चे मागचे कारण होते ते लक्षद्वीप आणि मालदीव यांच्यातील फरक. आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर याचा थेट परिणाम तेथील स्थानिक राजकारण देखील दिसून आला. आणि त्यानंतर सर्वत्र #Boycott_Maldives हा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात झाली.

नेमके हे प्रकरण काय?

Boycott Maldives Hashtag l पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 जानेवारीला लक्षद्वीपचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. एका भारतीय एक्स युजरने पंतप्रधान मोदी यांचा लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरतानाचा (Boycott Maldives Hashtag) व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर पोस्ट केला व यासोबत त्यांनी लिहिले की, “किती उत्तम पाऊल आहे भारतीय पंतप्रधानाचे! मालदीवमधील नव्या चीनचं पपेट असलेल्या सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. नक्कीच पंतप्रधानाच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना मिळेल.”

Boycott Maldives Hashtag l आमच्याशी स्पर्धा करण्याची आयडिया दिशाभूल करणारी : 

या भारतीयाला उत्तर देताना मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नेते जाहिद रमीझ यांनी लिहिले, “हे पाऊल खूप चांगले आहे. मात्र ही आमच्याशी स्पर्धा करण्याची आयडिया दिशाभूल करणारी आहे. एवढेच नव्हे तर भारतीय आम्ही देत ​​असलेली सेवा कशी देऊ शकतात? त्यांचे पर्यटन स्थळ एवढे स्वच्छ कसे असू शकतात?”

यानंतर रमीझ हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुन्हा एक पोस्ट करून म्हंटले कि भारतासारखा एवढा मोठा देश श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या पर्यटन शैलीची नक्कल करून पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक खेदाची बाब आहे.” तसेच मोदींच्या या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.

Boycott Maldives Hashtag l दरम्यान, राझीमच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरील अनेक एक्स यूजर्सनी पीपीएम नेते जाहिद रमीज संताप व्यक्त केला असून इतकेच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर Boycott Maldives देखील ट्रेंड करत आहे. एवढेच नव्हे तर सध्या भारतीय सोशल मीडिया वापरकर्ते मालदीववर बहिष्कार टाकण्याबद्दल आणि लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबद्दल लिहीत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Team India | अखेर ट्वेंटी-20 संघात रोहित-विराटची एन्ट्री; वर्ल्ड कपची तयारी सुरू?

Team India ची विजयी सलामी पण पाहुण्यांच कमबॅक; दुसऱ्या सामन्यात भारत चीतपट

Shakib Al Hasan बनला खासदार! विजयाचं सेलिब्रेशन अन् चाहत्याच्या दिली कानशिलात, VIDEO

Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!

Kangana Ranaut चा पुन्हा एकदा जावेद अख्तरांशी पंगा?; ‘त्या’ प्रकरणी हायकोर्टात धाव