Team India ची विजयी सलामी पण पाहुण्यांच कमबॅक; दुसऱ्या सामन्यात भारत चीतपट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India । सध्या भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी देण्यात यजमानांना यश आले. पहिल्या सामन्यात दारूण पराभव स्वीकारल्यानंतर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. रविवारी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. तिन्ही सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जात आहेत. दुसऱ्या सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. धावांसाठी धडपडताना दिसणार्‍या टीम इंडियाने 20 षटकांत 8 बाद केवळ 130 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे सोपे लक्ष्य 19 षटकांत चार विकेट्स गमावून पूर्ण केले. कांगारूंकडून एलिसे पेरीचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना होता, ज्यात तिने चमकदार कामगिरी केली.

Team India चा पराभव

दुसऱ्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने पहिला सामना नऊ विकेट राखून जिंकला होता आणि आता दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेचा अंतिम सामना पाहण्याजोगा केला. कारण तिसरा सामना याच मैदानावर 9 जानेवारीला होणार असून हा अंतिम सामना असणार आहे.

ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने सांघिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियासमोर लक्ष्य सोपे होते पण तरीही ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात हवी होती जेणेकरून सामना जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कर्णधार अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 51 धावा कुटल्या. आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीप्ती शर्माने हिलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. हिलीने 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा करून चांगली सुरूवात करून दिली होती.

ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका देण्यातही दीप्ती शर्माला यश आले. तिने 10व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आणखी एक बळी पटकावला. त्यानंतर श्रेयांका पाटीलने ताहिला मॅकग्राला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. पूजा वस्त्राकरने अॅश्ले गार्डनरला बाहेर पाठवून भारतीय चाहत्यांना जागे केले. मात्र, एलिसे पेरीने नाबाद 34 आणि फोबी लिचफिल्डने नाबाद 18 धावांची खेळी करत संघाला विजयाकडे नेले. ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत चार बाद 133 धावा करून विजय साकारला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून यजमान भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण, भारताकडून दीप्ती शर्मा वगळता एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी स्फोटक खेळी केली पण दुसऱ्या सामन्यात त्या अपयशी ठरल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 30 धावा केल्या पण तिला एलिसे पेरीने धावबाद केले. भारताने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 130 धावा केल्या होत्या.

Shakib Al Hasan बनला खासदार! विजयाचं सेलिब्रेशन अन् चाहत्याच्या दिली कानशिलात, VIDEO

Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!

Kangana Ranaut चा पुन्हा एकदा जावेद अख्तरांशी पंगा?; ‘त्या’ प्रकरणी हायकोर्टात धाव

Aishwarya Rai-जया बच्चन यांच्यानंतर आलिया भट आणि सासू नितू कपूरचं बिनसलं?,व्हिडीओच आला समोर

Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार नाही?, मोठी माहिती आली समोर