Shakib Al Hasan बनला खासदार! विजयाचं सेलिब्रेशन अन् चाहत्याच्या दिली कानशिलात, VIDEO

Shakib Al Hasan | बांगलादेश क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शाकिब अल हसनने राजकीय खेळी सुरू केली आहे. तापट आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणारा शाकिब आता खासदार बनला आहे. रविवारी बांगलादेशात पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत शाकिबचा मोठा विजय झाला आणि त्याने खासदार बनण्याचा मान पटकावला. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचे नेतृत्व करणाऱ्या शकिब अल हसनने मागुरा पश्चिम या लोकसभेच्या जागेवर सुमारे दीड लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला.

शाकिब अल हसनचा मोठ्या फरकाने विजय झाला असल्याची अधिकृत माहिती जिल्हा मुख्य प्रशासक अबू नसीर बेग यांनी दिली. मात्र, खासदार होताच शाकिबचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याच्या कानशिलात लगावताना दिसतो. शाकिबच्या या व्हायरल व्हिडीओवरून चाहते त्याची फिरकी घेत आहेत. मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकात देखील श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शाकिब वादग्रस्त अपीलवरून चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता.

 

Shakib Al Hasan बनला खासदार!

मात्र, विजयानंतर शाकिबकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शाकिबने सत्ताधारी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवली लीग पक्षाकडून निवडणूक लढवली. प्रमुख प्रतिस्पर्धी बांगलादेश नॅशनल पार्टीच्या तगड्या विरोधानंतर देखील अवामी लीग पाचव्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

शाकिब अल हसनने निवडणुकीपूर्वी सांगितले होते की, मला वाटत नाही की ही लढत चुरशीची होईल. कारण मला खात्री आहे की माझा एकतर्फी विजय होणार आहे. शाकिबने सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या निकालात दिसून आले. कारण शाकिब आणि प्रतिस्पर्धी उमेदवारामध्ये लढतही झाली नाही अन् शाकिबने मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला.

बांगलादेशात निवडणुकीचा थरार

तो म्हणाला होता की, संघ लहान असो वा मोठा, स्पर्धा आणि आव्हाने नेहमीच असतात. निवडणूक प्रचारात भाग घेतल्याने शाकिबलाही क्रिकेटमधून तात्पुरती रजा घ्यावी लागली होती. त्याचबरोबर खेळ आणि राजकारणातील जबाबदाऱ्यांचा समतोल साधता येणार नाही, ही बाब मात्र शाकिबने पूर्णपणे नाकारली होती. त्यामुळे खासदार असताना देखील शाकिब क्रिकेटच्या मैदानात दिसू शकतो.

शाकिबने अवामी लीगच्या तिकिटावर बांगलादेशची सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्याला या निवडणुकीत मोठे यश आले. पण, यासोबतच त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाकिब निवडणुकीच्या रंगात रंगलेला दिसत आहे, मात्र तो संतापतो आणि त्याच्या एका चाहत्याला थप्पड मारतो. यानंतर शाकिबवर जोरदार टीका होत आहे.

Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!

Kangana Ranaut चा पुन्हा एकदा जावेद अख्तरांशी पंगा?; ‘त्या’ प्रकरणी हायकोर्टात धाव

Aishwarya Rai-जया बच्चन यांच्यानंतर आलिया भट आणि सासू नितू कपूरचं बिनसलं?,व्हिडीओच आला समोर

Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार नाही?, मोठी माहिती आली समोर

Aishwarya Rai ची साथ विवेक ओबेरॉयने का सोडली?, विवेकच्या वडिलांनीच केला धक्कादायक खुलासा