Aishwarya Rai ची साथ विवेक ओबेरॉयने का सोडली?, विवेकच्या वडिलांनीच केला धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असतानाच आता ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि विवेक ओबेराय (Vivek Oberoi) यांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. स्वतः विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय (Suresh Oberoi) यांनी याबाबत माहिती दिली आहे. एकेकाळी ऐश्वर्या आणि विवेक हे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांनी ब्रेकअप केलं होतं.

विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय हे नुकतेच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘अ‍ॅनिमल’ (animal) या चित्रपटात दिसून आले होते. एका मुलाखती दरम्यान त्यांनी विवेक आणि ऐश्वर्या यांच्या संबंधाबद्दल मोठा खुलासा केला.

वडिलांनीच दिला ‘तो’ सल्ला |

सुरेश ओबेरॉय यांनी मुलाखती दरम्यान सांगितले कि,’मला विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल काहीच माहित नव्हते. खरे तर, रामू(राम गोपाल वर्मा)ने मला त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्यानंतर मीच विवेकला असं करू नको म्हटलो होतो.’, असं सुरेश ओबेरॉय यांनी म्हटलं

यासोबतच सुरेश ओबेरॉय यांनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबासोबत असलेल्या सबंधांबद्दलही खुलासा केला. विवेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या संबंधामुळेच सलमानचे आणि विवेकचे जोरदार भांडण झाल्याचं म्हटलं जातं. मात्र, या सर्व नात्यांच्या माझ्या आणि सलीम (सलमानचे वडील)च्या नात्यांत काही फरक पडला नसल्याचं सुरेश ओबेरॉय म्हणतात. सलमान जेव्हा पण भेटतो तेव्हा तो माझ्यासमोर सिगरेट लपवतो आणि हे सर्व काही तो माझ्याबद्दल असलेल्या आदरामुळे करत असल्याचे सुरेश ओबेरॉय यांनी सांगितलं.

Aishwarya Rai आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा |

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. ऐश्वर्याने अभिषेकच घर सोडल्याचंही म्हटलं गेलं. सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनीही ऐश्वर्यावर आरोप केले होते. या सर्व घडामोडींमुळे ऐश्वर्या अभिषेक सोबतचा संसार तोडणार, अशा चर्चा रंगत आहेत.

त्यातच आता विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय यांनी केलेल्या खुलास्यामुळे नवीनच चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावरही याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान,शनिवारी (5 जानेवारी) अभिषेकच्या जयपुर पिंक पँथर्स या कबड्डी संघाला ऐश्वर्या पूर्ण कुटुंबासोबत चीअर करताना दिसून आल्याने तूर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसते.

News Title- Aishwarya Rai and Vivek Oberoi Relationship

महत्त्वाच्या बातम्या-

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला