Ayodhya Ram Mandir | प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता भावूक; म्हणाला, “खूप काही गमावून…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayodhya Ram Mandir | येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) उद्धाटन सोहळा होणार आहे.यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी साधू-मुनींसह अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी ‘रामायण’ या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल (Arun Govil) यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याची त्यांना कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांच्यासोबतच ‘चाणक्य’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेने सर्वांची मने जिंकणारे अभिनेते मनोज जोशी यांनाही राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

अरुण गोविल नेमकं काय म्हणाले?

“या प्रसंगी मी अतिशय आनंदी आहे. वर्षांनंतर मला ही संधी मिळाली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी खूप काही गमावले आहे, शेवटी आपण राम लल्लाला (Ayodhya Ram Mandir) पाहणार आहोत. मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. या महिन्यात मी एकदा नाही तर, 3 वेळा अयोध्येला जाणार आहे. 21 जानेवारीच्या रात्री किंवा 22 जानेवारीला सकाळी राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित राहून पुन्हा मी आमच्या चित्रपट 695च्या संपूर्ण टीमसह राम मंदिरात जाईन.”, असे अरुण गोविल म्हणाले.

यावेळी अरुण गोविल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. “या सोहळ्याचे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला आहे. यासोबतच ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे आणि आजही यासाठी मेहनत घेत आहेत त्या सर्वांना याचे श्रेय जाते.”, असं म्हणत अरुण गोविल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Ayodhya Ram Mandir | अभिनेते मनोज जोशी भावूक |

हेराफेरी, धमाल, नटसम्राट आणि चाणक्य या चित्रपटांत आपल्या भूमिकेने बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) यावेळी भावूक झाल्याचे दिसून आले. “खरे तर हा प्रसंग (Ayodhya Ram Mandir) एक योगायोगच म्हणावा लागेल. कारण, आमचा चित्रपट 695 राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही दिवस आधी म्हणजे 19 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४ दिवसांनी राम लल्ला अयोध्येत येणार असून आम्ही त्यांना पाहणार आहोत. मी भाग्यवान आहे की मी अयोध्येला जात आहे.या प्रसंगामुळे मी अत्यंत भावूक झालो आहे.”, असे मनोज जोशी यांनी म्हटले.

दरम्यान, राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी सूरू असून भाजपकडून यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. हा सोहळा ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांकडून या सोहळ्याची आतुरतेने वाट पहिली जात आहे.

News Title- Ayodhya Ram Mandir Actor Arun Govil emotional

महत्त्वाच्या बातम्या-

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला