Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Captain Miller Trailer l साऊथचा सुपरस्टार धनुष त्याच्या ‘कॅप्टन मिलर’ याआगामी बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सुपस्टार धनुषचे चाहते त्याच्या ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच धनुषच्या चात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये धनुष डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. तर ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

धनुषसह हे दिग्गज कलाकार असणार महत्वाच्या भूमिकेत :

‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाचा ट्रेलर काल (6 जाने.) लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे. तर सत्य ज्योती फिल्म्स कंपनी अंतर्गत निर्मिती होणार आहे.

या चित्रपटामध्ये (Captain Miller) धनुष मुख्य भूमिकेत असणार आहे. तर प्रियंका अरुल मोहन, शिवराज कुमार, निवेदिता सतीश, विनायकन आणि संदीप किशन हे सहाय्यक भूमिकेत असणार आहेत. चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

Captain Miller Trailer l चित्रपट कधी प्रदर्शित होणार? :

अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत असणारा ‘कॅप्टन मिलर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट दक्षिण भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. चाहते आतुरतेने वाट पाहत असलेला ‘कॅप्टन मिलर’ (Captain Miller) हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

धनुषने ‘कॅप्टन मिलर’मधील त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो लांब केस आणि वाढलेली दाढीमध्ये दिसत आहे. 2.54 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये धनुष ब्रिटिशांविरुद्ध एकटाच लढताना दिसत आहे. कधी तो शत्रूंवर गोळ्यांचा वर्षाव करतो, तर कधी धारदार तलवारीने त्यांना मारत आहे. ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की तो एका गावाचे इंग्रजांपासून संरक्षण करत आहे आणि यादरम्यान तो मरण्यापासून ते मारण्यापर्यंत जातो.

‘कॅप्टर मिलर’च्या ट्रेलरमध्ये (Captain Miller Trailer) धनुष एक डायलॉग म्हणतो की, ‘तुम्ही सैतानबद्दल ऐकलेच असेल. मी तो सैतान आहे ज्याला लोक प्रेमाने कॅप्टन मिलर म्हणतात. यानंतर तो एकापाठोपाठ गोळ्या झाडू लागतो. ट्रेलरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत धनुष केवळ अॅक्शन करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral

Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार

Ram Mandir | रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव अन् प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आश्रम

Alia Bhatt चा ‘जलवा’! Animal ची सक्सेस पार्टी; रणबीरही दिसला डॅशिंग