Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

Sharad Mohol | शुक्रवारी कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर पुण्यातील गुन्हेगारी विश्व अद्याप किती भयंकर आहे याचा प्रत्यय समोर आला. शरदची त्याच्या राहत्या घराजवळ हत्या झाली अन् एकच खळबळ माजली. जुन्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आलं असून पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे अटकेत असलेल्यांमध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. शनिवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता काही नाट्यमय घडामोडी घडल्या.

खरं तर न्यायालयात आपली बाजू मांडताना वकिलांनाच अश्रू अनावर झाले. आरोपींसह वकिलांना अटक करून पोलिसांकडून अधिक तपास घेतला जात आहे. न्यायालयात बोलताना वकिलांनी म्हटले, “आरोपींनी शरद मोहोळची हत्या केल्यानंतर आम्हाला फोन केला होता. हत्या केली आहे आणि पोलीस ठाण्यात हजर राहायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मग आम्ही त्यांना पोलिसात हजर व्हा असा सल्ला दिला. पोलिसांना देखील याची माहिती दिली आहे.”

Sharad Mohol हत्या प्रकरणी 8 जणांना अटक

तसेच ज्या ठिकाणी हत्या झाली त्या घटनास्थळी असलेल्या पोलिसांना देखील हीच माहिती दिली असल्याची माहिती वकिलांनी दिली. मात्र, पोलिसांना सर्वकाही सांगून देखील त्यांनी आमचं काहीच ऐकून घेतलं नसल्याचं अटकेत असलेल्या एका वकिलानं सांगितलं. मागील पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात असून वकिली करत आहे, या प्रकरणात आम्ही काहीच केलं नसल्याचं दुसऱ्या वकिलानं न्यायालयात नमूद केलं.

लक्षणीय बाब म्हणजे यावेळी न्यायालयातच वकिलाला अश्रू अनावर झाले अन् तो रडू लागला. वकिलाची ही कृती पाहताच न्यायाधीशांनी सांगितलं की, जर तुम्ही काहीच केलं नसेल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. मात्र, वकिलाचं रडणं सुरूच होतं. न्यायालयानं दोन्ही वकिलांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन वकिलांनाही कोठडी

तर, इतर सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. शरद मोहोळची हत्या झाली तेव्हा त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसाच काहीसा प्रकार शनिवारी पाहायला मिळाला. जेव्हा आरोपींना न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली.

दरम्यान, आरोपींमध्ये वकिलांचा समावेश असल्याने स्थानिकांसह सदस्य आणि इतर वकिलांनी हजेरी लावली. त्यामुळे आरोपींना कोर्टात आणताता काहीसा अडथळा निर्माण झाला.

MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral

Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार

Ram Mandir | रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव अन् प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आश्रम

Alia Bhatt चा ‘जलवा’! Animal ची सक्सेस पार्टी; रणबीरही दिसला डॅशिंग

Kisan Vikas Patra Yojna l फायद्याची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास होणार दुप्पट