Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ather 450 Apex l सध्या भारतीय बाजारपेठेत ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देतात. असे असताना आता Ather Energy कंपनीने जबरदस्त फीचर्ससह Ather 450 Apex ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कुटर जबरदस्त वैशिष्टांसह सादर केली आहे. तर आज आपण Ather 450 Apex या इलेक्ट्रिक स्कुटर संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात…

Ather 450 Apex लूक आणि जबरदस्त फीचर्स :

Ather Energy कंपनीने त्यांच्या 10th Anniversary निमित्ताने Special Edition Scooter 450 Apex लाँच केली आहे. ही स्कुटर सादर करताना कंपनीने सांगितले आहे की, 450 Apex ही इलेक्ट्रिक स्कुटर शहरातील सर्व बाबींच्या वैशिष्ट्यांसह एक जबरदस्त राइडिंग अनुभव देते.

Ather 450 Apex बद्दल बोलायचे झाले तर ही स्कुटर Warp मोड प्रेमींसाठी सर्वात उत्तम आहे. कारण या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये Warp+ मोड सादर केला आहे, जो तुम्हाला फक्त 2.9 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग घेईल. महत्वाचं म्हणजे हे मोड उद्योगातील सर्वात वेगवान थ्रॉटल आहे. तसेच कंपनीच्या माहितीनुसार आता तुम्ही Ather 450 Apex स्कुटर तब्बल 100 किमी प्रति तास वेगाने चालवू शकता.

Ather 450 Apex l Ather कंपनीचे सह-संस्थापक तरुण मेहता यांचे स्पष्टीकरण :

Ather कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ यांनी Ather 450 Apex या स्कुटरबद्दल माहिती दिली आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये ‘मॅजिक ट्विस्ट’ हे नवीन फीचर्स देण्यात आले. हे फीचर्स एक रोमांचक नवीन वैशिष्ट्य आहे जे तुमची राइड अगदी मजेदार बनवते.

तसेच Ather कंपनी त्याच्या स्वच्छ आणि मिनिमलिस्ट डिझाइनसाठी ओळखले जाते. त्यामुळे या बाईकला Apex मध्ये मुद्रित केशरी चेसिसवर एक पारदर्शक पॅनेल दिला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार पारदर्शक पॅनेल असलेली ही भारतातील एकमेव स्कूटर आहे.

तरुण मेहता म्हणाले की, रंगसंगतीवर आल्यावर आम्ही काही धाडसी पावले उचलली, पॅनेलसाठी ठळक इंडियम निळा आणि विरोधाभासी केशरी दिला आहे असे कंपनीचे सह-संस्थापक तरुण मेहता यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Ram Mandir | रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव अन् प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आश्रम

Alia Bhatt चा ‘जलवा’! Animal ची सक्सेस पार्टी; रणबीरही दिसला डॅशिंग

Kisan Vikas Patra Yojna l फायद्याची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास होणार दुप्पट

Ram Mandir | वडिलांची इच्छा अन् 8000 किमी चालत वृद्धाची अयोध्येकडे कूच

PAK vs AUS | पाकिस्तानचा दारूण पराभव पण भारताचे मोठे नुकसान, ऑस्ट्रेलिया सुसाट