PAK vs AUS | पाकिस्तानचा दारूण पराभव पण भारताचे मोठे नुकसान, ऑस्ट्रेलिया सुसाट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PAK vs AUS | तीन सामन्यांच्या मालिकेत वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका झाली. यजमान कांगारूंनी तिन्ही सामने जिंकून आपला दबदबा कायम ठेवला. मागील 28 वर्षांत एकदाही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. हीच परंपरा नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाने कायम ठेवली. तिसऱ्या सामन्यात चमत्कार होईल अन् पाकिस्तानी संघ विजय मिळवेल अशी पाकिस्तानी चाहत्यांना आशा होती पण तसे काहीच झाले नाही.

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव करून ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC 2025) क्रमवारीतील आपले स्थान मजबूत केले. एकूणच पराभव पाकिस्तानचा पण याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

PAK vs AUS पाकिस्तानचा पराभव अन् भारताचे नुकसान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावले होते. पण, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप करून दबदबा कायम ठेवला. 29 वर्षांनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. 1995 मध्ये त्यांनी येथे शेवटचा विजय मिळवला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 जिंकले आहेत आणि 2 मध्ये कांगारूंना पराभवाला सामोरे जावे लागले. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 56.25 इतकी आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे आता 54 गुण झाले आहेत. तर भारतीय संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दबदबा

दरम्यान, बराच काळ क्रमवारीत वर्चस्व गाजवल्यानंतर भारताचा पहिला क्रमांक गेला. WTC चे हे तिसरे पर्व असून दोन्ही पर्वांमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण, भारताला अद्याप एकदाही या स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 54.16 आहे, जी ऑस्ट्रेलियापेक्षा सुमारे 2 टक्के कमी आहे. WTC 2025 मध्ये भारताने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. तर, एका सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकेच्या विजयाची टक्केवारी 50 टक्के एवढी आहे. पदार्पणाच्या पर्वातील चॅम्पियन न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय बांगलादेश सध्या पाचव्या स्थानावर स्थित आहे.

Ambati Rayudu ची पलटी! 10 दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश; आता घेतला वेगळाच निर्णय

Rohit Sharma च्या चाहत्यांना सुखद धक्का; BCCI नं दिली मोठी खुशखबर

‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली’?; ‘या’ बड्या नेत्याचा मुनगंटीवारांना सवाल

‘Wake up sid’चा सिक्वेल येणार?; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Aishwarya Rai ने केला मोठा खुलासा, म्हणाली… “त्यामुळे मी बच्चन कुटुंबासोबत राहणं…”