‘Wake up sid’चा सिक्वेल येणार?; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wake Up Sid | अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वेक अप सिड’ (Wake Up Sid) या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा एकत्र दिसून आले होते. या चित्रपटानंतर हे दोघे तब्बल 14 वर्षांनंतर एकत्र दिसून आले. त्यांना एकत्र बघून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. 2023 मधील रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटानंतर लवकरच त्याच्या ‘वेक अप सिड’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रणबीर आणि कोंकणा यांचा सोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘वेक अप सिड’चा सिक्वेल येणार?

‘वेक अप सिड’ (Wake Up Sid) या चित्रपटाचा सिक्वेल येणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र रणबीर आणि कोंकणाने एका मोबाईलची जाहिरात केली आहे. सोशल मीडियावर हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. रणबीर-कोंकणाशिवाय शिखा तलसानिया आणि नमित दास देखील जाहिरातीत दिसत आहेत. हे दोघेही या चित्रपटाचा एक भाग होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by OPPO India (@oppoindia)

‘वेक अप सिड’ हा दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. आता सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे चाहत्यांकडून ‘वेक अप सिड’चा सीक्वल येणार असल्याचा दावा केला जात आहे.

‘Wake Up Sid’ ठरला रणबीरचा पहिला हिट चित्रपट

दरम्यान, 2009 मध्ये रिलीज झालेल्या ‘वेक अप सिड’ हा रणबीर कपूरचा पहिला हिट चित्रपट ठरला होता. त्यापूर्वी त्याचे ‘सावरिया’आणि ‘बचना ए हसीनो’हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. ‘वेक अप सिड’ (Wake Up Sid) मुळे रणबीरच्या फिल्मी करिअरला भरारी मिळाली. चाहत्यांकडून आता ‘वेक अप सिड’च्या सिक्वेलची आतुरते वाट पाहिली जात आहे.

News Title :  wake up sid sequel talks

महत्त्वाच्या बातम्या- 

Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी! 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू

Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही