‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली’?; ‘या’ बड्या नेत्याचा मुनगंटीवारांना सवाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Wadettiwar | छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे हे शस्त्र सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयात आहे. लवकरच ही वाघनखं भारतात आणली जाणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी लंडन दौराही केला होता.

मंत्री मुनगंटीवार यांनी नोव्हेंबर महिन्यात वाघनखं भारतात भारतात येणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता डिसेंबर संपून नवीन वर्ष सुरु झालंय. तरी, वाघनखं भारतात आली नाहीत. यावरूनच काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधत खोचक सवाल केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत वाघनखांवरून टोला लगावला आहे.

Vijay Wadettiwar यांनी नेमकं काय म्हटलं?

“नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते. त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, तो महिना गेला. वर्ष संपलं आता 2024 उजाडले असून जानेवारी पण हुकले तरी वाघनखं काही आली नाही. आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार?”, असा खोचक सवाल विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी मुनगंटीवार यांना केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी नोव्हेंबर मध्ये वाघनखं आणण्याचा वायदा केला होता. आता जानेवारी महिना सुरु असून अद्याप वाघनखांबाबत काहीच हालचाली न झाल्यामुळे विरोधी पक्षाकडून मुनगंटीवारांसह सरकारवर टीका केली जात आहे.

वाघनखं महाराष्ट्रात कधी येणार?

लंडनहून वाघनखं भारतात येण्यास अजून तरी तीन चार महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल महिन्यात वस्तुसंग्रहालयाशी राज्य सरकारचा करार होऊन मे अखेरपर्यंत ती मुंबईत आणली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

वस्तुसंग्रहालयानंतर ब्रिटिश सरकारची मंजुरी मिळाली की, केंद्र सरकार व ब्रिटिश सरकार यांच्यात यासंदर्भातील करार करण्यात येईल. त्यापुढे वाघनखं भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु होईल.

 News Title : Vijay Wadettiwar question to Sudhir Mungantiwar

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी 2 वकिलांना अटक, आणखी मोठ्या व्यक्तीचा सहभाग?

Black Coffee Benefits | डिप्रेशन आणि ताण होईल दूर; ‘ब्लॅक कॉफी’ चे हे फायदे माहितीयेत का?

Aishwarya Rai अभिषेक पेक्षा जास्त कमावते, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Tecno Pop 8 Launch l अवघ्या 5999 रुपयांत खरेदी करा या कंपनीचा स्मार्टफोन! मिळणार जबरदस्त फीचर्स