Rohit Sharma च्या चाहत्यांना सुखद धक्का; BCCI नं दिली मोठी खुशखबर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma । दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दौरा संपवून टीम इंडिया मायदेशात परतली आहे. भारत आगामी काळात आपल्या घरी अफगाणिस्तानविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. यासाठी पाहुण्या अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला असून टीम इंडियाची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार याची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण मागील काही कालावधीपासून हार्दिक पांड्या भारताच्या ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व करत आहे, अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत ही जबाबदारी सूर्यकुमार यादवने पार पाडली.

मात्र, हार्दिक आणि ‘सूर्या’ दोघेही दुखापतग्रस्त असल्याने भारताला नवीन कर्णधार मिळेल अशी चर्चा सुरू आहे. अशातच भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाल्याचे दिसते. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली मागील ट्वेंटी-20 विश्वचषकापासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून दूर आहेत. मात्र, आगामी मालिकेतून या दिग्गजांचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

Rohit Sharma च्या चाहत्यांना सुखद धक्का

माहितीनुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय विराट कोहलीही अफगाणिस्तान मालिकेत खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जवळपास वर्षभर भारताकडून ट्वेंटी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे या जोडीला ट्वेंटी-20 मध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. ‘स्पोर्ट्स टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत भारताची धुरा सांभाळणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. अफगाणिस्तानचा संघ जाहीर झाला असला तरी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. ट्वेंटी-20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनावर कायमच सस्पेंस राहिला आहे.

जूनमध्ये ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार

आयपीएल 2024 पार पाडल्यानंतर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ट्वेंटी-20 विश्वचषकात खेळणार हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. अलीकडेच विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले होते की, त्याला ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे.

अफगाणिस्तानचा संघ खालीलप्रमाणे –

इब्राहिम झादरान (कर्णधार), हमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन-उल-हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब आणि राशिद खान.

‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली’?; ‘या’ बड्या नेत्याचा मुनगंटीवारांना सवाल

‘Wake up sid’चा सिक्वेल येणार?; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Aishwarya Rai ने केला मोठा खुलासा, म्हणाली… “त्यामुळे मी बच्चन कुटुंबासोबत राहणं…”

Sharad Mohol हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात धक्कादायक माहिती समोर आल्याने उडाली मोठी खळबळ

Janhvi Kapoor च्या बॉयफ्रेंडचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल; नेटकरी बोलले हे काय चाललंय?