Ambati Rayudu ची पलटी! 10 दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश; आता घेतला वेगळाच निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ambati Rayudu | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने क्रिकेटला रामराम केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. मात्र, अवघ्या दहा दिवसांत त्याने आपला निर्णय बदलला आहे. खरं तर त्याने राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल त्यानेच माहिती दिली असून सोशल मीडियावर एक पोस्ट करत राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. रायुडूने 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.

अंबाती रायुडूने युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टीचा (YSRCP) राजीनामा दिला. विशेष बाब म्हणजे त्याने राजकारण कायमचे सोडले नसले तरी तो काही काळ राजकारणापासून दूर झाला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची माहिती दिली. 2019 च्या विश्वचषकात संधी न मिळाल्यानंतर रायुडू खूप चर्चेत होता.

Ambati Rayudu ची पलटी

रायुडूने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, “मी आपणांस कळवत आहे की, मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वेळी पुढील निर्णयाची घोषणा केली जाईल.” एकूणच तूर्तास रायुडू राजकारणापासून दूर झाला आहे.

 

 

दरम्यान, रायुडूने 28 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते. रायुडूने पक्ष सोडण्याच्या निर्णयाबाबत काहीही स्पष्ट कारण दिले नाही. योग्य वेळ आल्यावर पुढील माहिती देणार असल्याचे त्याने नमूद केले.

IPL मधूनही निवृत्त

रायुडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केला होता. 2023 च्या आयपीएलमध्ये रायुडू चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा भाग होता. चेन्नईने आयपीएलचा किताब जिंकून आपल्या स्टार खेळाडूला निरोप दिला. याआधी 2019 मध्ये रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

अंबाती रायुडूच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 55 एकदिवसीय आणि 6 ट्वें-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने विविध फ्रँचायझींमधून 203 आयपीएल सामने खेळले आहेत.

Rohit Sharma च्या चाहत्यांना सुखद धक्का; BCCI नं दिली मोठी खुशखबर

‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली’?; ‘या’ बड्या नेत्याचा मुनगंटीवारांना सवाल

‘Wake up sid’चा सिक्वेल येणार?; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Aishwarya Rai ने केला मोठा खुलासा, म्हणाली… “त्यामुळे मी बच्चन कुटुंबासोबत राहणं…”

Sharad Mohol हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात धक्कादायक माहिती समोर आल्याने उडाली मोठी खळबळ