Sharad Mohol हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात धक्कादायक माहिती समोर आल्याने उडाली मोठी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Mohol | पुण्याच्या कोथरुडमध्ये (Kothrud, Pune) शुक्रवारची दुपार समस्त पुणेकरांना हादरवून सोडणारी होती. पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर भडकल्याची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कोथरुडमध्ये मध्यवस्तीत भर दुपारी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात पुण्यातील कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली.

पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी लगेचच मोठी कारवाई केली. आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे वकील असल्याचं समोर आलंय. अवघ्या 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहील पोळेकर (Munna Alias Sahil Polekar ) याने शरद मोहोळ याची हत्या केली आहे.

सर्वात महत्त्वाची माहिती समोर-

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हत्या का करण्यात आली यावर मोठी माहिती दिली आहे. मुन्ना पोळेकर यांने पूर्ववैमनस्यातून शरद मोहोळची (Sharad Mohol Murder Case) हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुन्ना पोळेकर याचे मामा नामदेव कानगुडेचे आणि शरद मोहोळचे जुने वाद होते, याच वादातून मुन्नाला शरदची हत्या करायची होती. त्यामुळे मुन्नासोबत त्याचा मामा सुद्धा या कटात सामील असल्याचं समोर आलं आहे.

शरद मोहोळची हत्या करायचा खूप दिवसांचा प्लॅन असावा, असं समोर आलेल्या माहितीवरुन तरी दिसत आहे. कारण मुन्नाने आधी शरद मोहोळच्या जवळच्या वर्तुळातील लोकांसोबत उठबस सुरु केली होती, त्यानंतर तो शरद मोहोळच्या संपर्कात आला होता. विशेष म्हणजे तो शरद मोहोळच्या घरापासून २०० मीटर अंतरावर रहायला देखील होता.

वेळ मिळताच मुन्नाने काढला काटा-

अत्यंत विचार करुन मुन्नाने किंवा त्याच्या मामाने हा प्लॅन बनवला असण्याची शक्यता आहे. शरद मोहोळच्या सोबत आल्यानंतर त्याने त्याचा विश्वास संपादन केला असावा, त्यानंतर वेळ मिळताच त्याने शरद मोहोळवर गोळीबार केला. शरद मोहोळवर केलेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज (Sharad Mohol attack CCTV Footage) सुद्धा समोर आलं आहे.

मुन्नाला या प्रकरणात आणखी काही जणांनी देखील मदत केली आहे. यामध्ये मुख्यतः आणखी 5 आरोपी तर 2 वकिलांचा देखील समावेश आहे, मात्र वकिलांच्या अटक प्रकरणाची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Sharad Mohol Murder Case News)

News Title: pune news sharad mohol case important update

महत्त्वाच्या बातम्या-

Rhea Chakraborty ला CBI चा दणका?; सुशांत सिंह प्रकरणी मोठी अपडेट समोर

Sharad Mohol चं शेवटचं स्टेटस… मर्डरआधी कुणाला म्हणाला होता… “दूर तुझसे मैं रहके बता क्या करू?”

Pune News | शरद मोहोळचा खात्मा करुन मुन्ना पळाला, मात्र पुढे… पुणे पोलिसांनी सांगितला घटनेचा थरार

Pune News : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी 2 वकिलांना अटक, आणखी मोठ्या व्यक्तीचा सहभाग?

Sharad Mohol धाडकन् खाली कोसळला, भरदुपारी घडलेल्या थराराचं CCTV फुटेज आलं समोर