पुणे | पुण्यात कोथरूडमध्ये भरदुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर जखमी झालेल्या शरद मोहोळला रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या गोळीबारात शरद मोहोळचा मृत्यू झाला. पुण्यात भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली.
पुण्यात भरदुपारी गोळीबाराचा थरार
एखाद्या चित्रपटाचा सीन शोभावा असा हा थरारक प्रसंग प्रत्यक्षात घडलाय. कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्यावर दिवसाढवळ्या गोळया झाडण्यात आल्याने संपूर्ण पुणं हादरलं. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर या शरद मोहोळच्या साथीदारानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं. आता या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे गुंड शरद मोहोळवर हल्ला करण्यापूर्वी साहिल आणि इतर साथीदारांनी शरदच्या घरीच जेवण केलं होतं. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्याचे सर्व साथीदर घरी जेवायला जमले होते. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले आणि थोड्याच अंतरावर जाऊन त्यांनी शरद मोहोळवर गोळीबार केला.
सीसीटीव्हीमध्ये शरद मोहोळच्या हत्येचा थरार दिसत आहे. भरदुपारी झालेल्या या गोळीबाराचा थरार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यात शरद मोहोळवर आरोपी मुन्ना चार गोळ्या झाडताना दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये आरोपींनी अगदी जवळून शरदवर हल्ला केल्याचं दिसत आहे.
शरद मोहोळ धाडकन खाली कोसळतो…
सीसीटीव्हीमध्ये शरद मोहोळ चालत पुढे जात असतो. तेवढ्यात मागून त्याच्यावर गोळी झाडण्यात येते. तो पुढे वळतो अन् त्याच्या छाताडावर पुन्हा तीन गोळ्या झाडल्या जातात. पहिल्याच गोळीनंतर शरद मोहोळ धाडकन खाली कोसळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
#CCTV footage captured firing on goon #SharadMohol in Sutardara, Kothrud, #Pune. pic.twitter.com/kzgPlz9kBv
— Punekar News (@punekarnews) January 6, 2024
दरम्यान, शरद मोहोळ याच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल पोळेकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. हेच नाही तर आठ आरोपींपैकी दोन वकिलांचा देखील या हत्येमध्ये सहभाग आहे. शरद मोहोळ याची हत्या वैमनस्यातून आणि जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अजूनही या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
Black Coffee Benefits | डिप्रेशन आणि ताण होईल दूर; ‘ब्लॅक कॉफी’ चे हे फायदे माहितीयेत का?
Aishwarya Rai अभिषेक पेक्षा जास्त कमावते, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल
‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल
Tecno Pop 8 Launch l अवघ्या 5999 रुपयांत खरेदी करा या कंपनीचा स्मार्टफोन! मिळणार जबरदस्त फीचर्स
Barc TRP Report Week 52 l BARC ने जाहीर केला TRP रिपोर्ट; या 5 सिरीयलने मिळवले अव्वल स्थान