Tecno Pop 8 Launch l आजकाल ग्राहक मोबाईल खरेदी करताना 5 ते 10 हजारात जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण सध्या वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे सर्वांनाच स्मार्टफोन खरेदी करायचा असतो त्यामुळे Tecno ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याची किंमत 6000 रुपयांपेक्षा देखील कमी आहे. या स्मार्टफोनचे नाव Tecno Pop 8 असे आहे. या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…
Tecno Pop 8 Launch l जाणून घेऊयात कॅमेरा, बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी :
टेक्नो कंपनीने सादर केलेल्या Tecno Pop 8 या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना जबदरदास्त फीचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 6.56 इंच एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो डॉट-इन डिस्प्लेसह येत आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे.
Tecno Pop 8 हा स्मार्टफोन 4GB RAM आणि 64GB STORAGE सह सुसज्ज आहे. महत्वाची बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 4GB एक्स्टेंडेड RAM देखील देण्यात आली आहे. तसेच या फोनच्या मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने STAORAGE 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन 9 जानेवारी 2024 पासून Amazon या ईकॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे.
Tecno Pop 8 Launch l जाणून घेऊयात कॅमेरा स्पेसिफिकेशन :
कंपनीने Tecno Pop 8 या स्मार्टफोनला उत्तम कॅमेरा स्पेसिफिकेशन दिले आहेत. जो की बॅक कॅमेरा 12MP ड्युअलसह सेटअप देण्यात आला आहे. तसेच तो ड्युअल एलईडी लाइटसह सादर करण्यात आला आहे. या मोबाईलच्या फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर फ्रंट कॅमेरा हा 8MP सह सेन्सर देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या पुढच्या बाजूला देखील यूजर्सना ड्युअल एलईडी स्लिट फ्लॅशलाइटची सुविधा मिळणार आहे.
याशिवाय Tecno Pop 8 या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
Tecno Pop 8 Launch l Tecno Pop 8 या स्मार्टफोनची किंमत किती असणार? :
ग्राहकांना हा स्मार्टफोन अगदी कमी किमतीत मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या 4GB RAM व 64GB STORAGE ची किंमत 6,499 रुपये ठेवली आहे. मात्र मर्यादित वेळेसाठी या स्मार्टफोनला ऑफर देण्यात आली आहे जे की त्याची किंमत 5,999 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Barc TRP Report Week 52 l BARC ने जाहीर केला TRP रिपोर्ट; या 5 सिरीयलने मिळवले अव्वल स्थान
Girish Mahajan | मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी!; 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू
Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू
Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची