Girish Mahajan | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक गटांमध्ये जागावाटपाच्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशात भाजप नेत्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
Girish Mahajan यांच्या वक्तव्याने खळबळ
भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले Girish Mahajan?
निवडणुकीच्या आधीच होईल. आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय म्हणून. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील, असं गिरीश महाजन म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं महाजन म्हणालेत. यामुळे राज्यात नेमकं काय घडणारे?, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
राज्यात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही जोरदार हालाचाली घडत आहेत, या पूर्श्वभूमीवर महाजनांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी! 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू
Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू
Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची
Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?
TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही