TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TATA । टाटा कंपनीने चौथी इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणली असून शुक्रवारपासून Punch.ev च्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी म्हणून टाटा मोटर्सची ओळख आहे. नववर्षाच्या सुरूवातीलाच ग्राहकांच्या भेटीला टाटाची एक नवीन कार आली आहे. कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार टाटा पंचच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची झलक दाखवली. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये असलेले फिचर्सही सांगण्यात आले आहेत. टाटा ही एक भारतीय बाजारपेठेतील नामांकित कंपनीपैकी एक आहे.

TATA ची चौथी इलेक्टिक कार

5 जानेवारीपासून या कारच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. ग्राहकांना ही कार कोणत्याही डीलरशिपद्वारे 21000 रुपयांच्या टोकन मनीमध्ये बुक करता येणार आहे. अलीकडेच कंपनीने Tata Nexon ची इलेक्ट्रिक आवृत्ती देखील लॉन्च केली आणि तिची फेसलिफ्ट आवृत्ती देखील चाहत्यांच्या भेटीला आणली. टाटा पंच EV वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. एम्पॉर्ड ऑक्साइड ड्युअल टोन, सीवीड ड्युअल टोन, डेटोना ग्रे ड्युअल टोन, फियरलेस रेड ड्युअल टोन आणि प्रिस्टाइन व्हाइट ड्युअल टोन हे पर्याय ग्राहकांसमोर असणार आहेत.

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा बराच दबदबा आहे. कंपनीने पंच इव्हीमध्ये (Punch.ev) 2 ड्रायव्हिंग रेंज ऑफर केली आहे. यामध्ये लांब पल्ल्यासाठी 3 ट्रिम्सची रेंज देण्यात आली आहे आणि स्टँडर्ड ड्रायव्हिंग रेंजमध्ये 5 ट्रिम्सचा पर्याय मिळत आहे. तसेच मोठ्या रेंजमध्ये बॅटरी पॅकसाठी देखील 2 पर्याय आहेत. पहिला 3.3 किलोवाटचा वॉलबॉक्स चार्जर आहे आणि दुसरा 7.2 KW चा फास्ट चार्जर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या चार्जिंगची चिंता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. कंपनीने ही कार 4 वेगवेगळ्या कलरमध्ये सादर केली आहे.

TATA च्या Punch.ev चे बुकिंग सुरू

टाटाच्या या नव्या कोऱ्या कारमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि स्मार्ट डिजिटल DRLs ची सुविधा आहे. हे डीआरएल गुडबाय आणि वेलकम सिक्वेन्ससह येतात. याशिवाय 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा मिळणार आहे. तर, कारमध्ये मल्टिपल व्हॉईस असिस्टन्स, लेदरेट व्हेंटिलेटेड सीट्स, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, SOS फंक्शन आणि DC फास्ट चार्जिंगची सोय आहे. लक्षणीय बाब म्हणजे 6 Airbags प्रवाशांचे संरक्षण करतील.

 

स्मार्ट ट्रिममध्ये मिळणाऱ्या फिचर्सव्यतिरिक्त

क्रूज कंट्रोल
समोर धुके असल्यास मदत
7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम
Android Auto आणि Apple CarPlay

Smart, Adventure ट्रिममध्ये मिळणाऱ्या फिचर्सव्यतिरिक्त

16 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स
AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर
ऑटो फोल्ड ORVM
SOS फंक्शन
10.25 इंच एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम
ड्युअल टोन बॉडी कलर

Smart, Adventure, empowered ट्रिममध्ये मिळणाऱ्या फिचर्सव्यतिरिक्त

लेदरेट सीट्स
360 डिग्री कॅमेरा
ब्लाइंड स्पॉट व्ह्यू आरसा
हवेशीर समोरच्या जागा
वायरलेस स्मार्टफोन चार्जर
10.25 इंच डिजिटल कॉकपिट

Health Updates l रिकाम्या पोटी चहा पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम; नक्की वाचा

Ram Mandir | २२ तारखेलाच बाळाचा जन्म व्हायला हवा; गर्भवती महिलांची मागणी

Rohit Sharma च्या युवा शिलेदारानं झळकावलं द्विशतक!

IND vs SA | ‘फायनल’ तिसरा कसोटी सामना व्हायला हवा; दिग्गजाची मागणी

Smriti Mandhana चे ‘मानधन’ वाढलं! ट्वेंटी-20 मध्ये रचला इतिहास