IND vs SA | ‘फायनल’ तिसरा कसोटी सामना व्हायला हवा; दिग्गजाची मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs SA | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाउन कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत हा सामना 7 विकेटने जिंकून इतिहास रचला. हा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. यातीलच एक कारण म्हणजे खेळपट्टी… खराब खेळपट्टी असल्याचा दावा अनेकांनी केला. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्मा या मुद्द्यावरून संतापल्याचे दिसले. अशातच इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने एक अजब मागणी केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने तिसरी कसोटीही खेळली पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.

IND vs SA ठरला सर्वात लहान सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना केपटाउन येथे खेळवला गेला. हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान ठरला. कारण अवघ्या दीड दिवसात सामन्याचा निकाल लागला अन् भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. खेळपट्टीवरून हा सामना चर्चेत राहिला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी देखील खेळपट्टीवर भेगा असल्याचा दावा केला.

दरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननेही आपले मत मांडणारी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने आणखी एक सामना खेळवण्याचा सल्ला दिला. पीटरसनची मागणी पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. कारण तो म्हणतो की अजून वेळ आहे, त्यामुळे भारत आणि आफ्रिका यांच्यात आणखी एक कसोटी सामना होऊ शकतो. असे झाल्यासही दोन्हीही संघ नियोजित वेळी घरी जाऊ शकतात.

IND vs SA सामन्यावर मिश्किल टिप्पणी

केविन पीटरसनने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, “उद्यापासून केपटाउनमध्ये तिसरा आणि निर्णायक सामना खेळण्यासाठी पुरेसा वेळ आहे. मालिकेचा निश्चित निकाल लागेल आणि खेळाडूंना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी बुक केलेली विमाने देखील चुकणार नाहीत.” एकूणच दुसऱ्या सामन्याच्या नियोजित दिवसांमध्ये आणखी एक सामना होईल, अशी मिश्किल प्रतिक्रिया पीटरसनने दिली.


 

IND vs SA भारताचा मोठा विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाउन कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. केपटाउन कसोटी केवळ 107 षटके (642 चेंडू) चालली, त्यामुळे निकाल लागलेली ही सर्वात लहान कसोटी ठरली आहे. भारताला सलामीच्या सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, केपटाउन कसोटीतील विजयाने भारताने पुनरागमन केले.

यापूर्वी 1932 मध्ये मेलबर्नमध्ये बनवलेला 91 वर्षे जुना विक्रमही केपटाउन कसोटी सामन्याने मोडला. केपटाउन कसोटी 7 विकेटने जिंकून भारताने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Indian Police Force Trailer l ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर आऊट

T20 World Cup 2024 l टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार भारत-पाक यांच्यात महामुकाबला

Deepika Padukone | ‘ओम शांती ओम’ नाही तर ‘हा’ होता दीपिकाचा पहिला चित्रपट

Aishwarya Rai | ‘…म्हणून मी गप्प आहे’; अभिषेक बच्चनने केला मोठा खुलासा

MS Dhoni | IPL पूर्वीच धोनीला मोठा धक्का, जवळच्याच मित्राने केला घात; जाणून घ्या नेम