Rohit Sharma च्या युवा शिलेदारानं झळकावलं द्विशतक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma । सध्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या स्पर्धेचा थरार सुरू आहे. शुक्रवारी हैदराबाद क्रिकेट संघाचा फलंदाज राहुल सिंग गेहलोतने नागालँड क्रिकेट संघाविरुद्धच्या प्लेट ग्रुप सामन्यात शानदार द्विशतक झळकावले. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. कधीकाळी भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या राहुलने नवा इतिहास रचला.

Rohit Sharma चा शिलेदार चमकला

खरं तर राहुल सिंग आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा भाग आहे. राहुलच्या द्विशतकी खेळीमुळे हैदराबादने पहिला डाव 5 बाद 474 धावांवर घोषित केला. राहुलने केवळ 143 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात फक्त रवी शास्त्रींनी त्याच्यापेक्षा वेगवान द्विशतक झळकावण्याची किमया साधली, शास्त्रींनी अवघ्या 123 चेंडूत ही कामगिरी केली होती. स्फोटक फलंदाजी करणारा गेहलोत 157 चेंडूत 214 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 9 षटकार मारले.

दरम्यान, या द्विशतकी खेळीसह गेहलोतने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याच्या नावावर 44 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने 3,141 धावांची नोंद आहे. त्याने 9 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत.

Rohit Sharma चा दुसरा सहकारीही सुसाट

विशेष म्हणजे तो पहिल्यांदाच हैदराबादच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2016 ते 2023 या काळात तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेससाठी खेळला आहे. हैदराबादच्या संघाचा कर्णधार तिलक वर्माने 112 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने तिलकने शतक पूर्ण केले.

235 धावांवर हैदराबादचा दुसरा गडी बाद झाला अन् कर्णधाराची एन्ट्री झाली. तिलक वर्माने राहुल गेहलोतसोबत 118 धावांची भागीदारी नोंदवली. तिलकने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने सांघिक कामगिरी केली.

पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ७६.४ षटकांची फलंदाजी केल्यानंतर हैदराबादने 5 बाद 474 धावांवर डाव घोषित केला. सलामीवीर तन्मय अग्रवालने 80 धावांचे योगदान दिले. नागालँडसाठी 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. इम्लिवाती लेमतुर हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने 16 षटकात 97 धावा दिल्या.

Deepika Padukone | ‘ओम शांती ओम’ नाही तर ‘हा’ होता दीपिकाचा पहिला चित्रपट

Aishwarya Rai | ‘…म्हणून मी गप्प आहे’; अभिषेक बच्चनने केला मोठा खुलासा

MS Dhoni | IPL पूर्वीच धोनीला मोठा धक्का, जवळच्याच मित्राने केला घात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मृत्यूनंतर Sharad Mohol चं राजकीय कनेक्शन समोर!

Manoj Bajpayee ची राजकारणात एंट्री?; म्हणाला, ‘200 टक्के खात्री…’