Ram Mandir | २२ तारखेलाच बाळाचा जन्म व्हायला हवा; गर्भवती महिलांची मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारीला भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. याच दिवशी प्रभू श्री राम यांच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील लोकांना या कार्यक्रमात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी व्हायचे आहे. राम मंदिर ट्रस्टच्या वतीने नामांकित मंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे. दुसरीकडे, राजकारणही चांगलेच तापल्याचे दिसते. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची तयारी सुरू आहे.

Ram Mandir 22 तारखेला भव्य कार्यक्रम

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 तारखेला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अनोखी बातमी समोर आली आहे. खरं तर कानपूरमधील गर्भवती महिलांनी एक वेगळी मागणी केली असून होणाऱ्या बाळाचा जन्म 22 तारखेलाच व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 22 जानेवारी हा शुभ दिवस असून या दिवशी बाळाचा जन्म व्हावा, अशी इच्छा गर्भवती महिलांची आहे.

ज्या दिवशी रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होतील त्याच दिवशी घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं तर तो शुभ योग असेल, असे कुटुंबीयांनी सांगितले. डॉक्टरांनी देखील या वृत्ताला दुजारा दिला असून शक्य तितका प्रयत्न केला जाईल अशी माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली.

Ram Mandir उद्घाटन अन् महिलांची मागणी

कानपूरच्या GSVM मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, अनेक गर्भवती महिला रूग्णालयात हजेरी लावत आहेत. 22 जानेवारीला प्रसूती करण्यासाठी डॉक्टरांना विनंती करत आहेत. मेडिकल कॉलेजच्या आचार्य डॉ. सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, ज्या गर्भवती महिलांची प्रसूतीची तारीख 20 जानेवारी आहे. त्यांनी देखील 22 जानेवारीला प्रसूती करण्याची मागणी केली आहे.

Ram Mandir आणि सामान्यांच्या भावना

दरम्यान, रामलला विराजमान होणार त्याच दिवशी बाळाचा जन्म व्हावा यासाठी अनेक गर्भवती महिला प्रयत्नशील आहेत. त्या संबंधित डॉक्टरांकडे तशी मागणीही करत आहेत. आतापर्यंत जवळपास 15 महिलांनी ही मागणी केली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय कानपूर शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 22 तारखेला प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत, मग आपल्या मुलांचा जन्म याच दिवशी व्हावा अशी कुटुंबीयांची इच्छा आहे. तसेच यापेक्षा चांगला शुभ योग असू शकत नाही अशीही धारणा आहे.

डॉ. सीमा द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या जन्माची वेळ आणि क्षणही खूप खास असतात. कारण मुलाच्या जन्मापासूनच त्याच्या आयुष्याची स्थिती आणि दिशा ठरवली जाते. त्यामुळे कुटुंबीयांचा हा खटाटोप सुरू आहे. गर्भवती महिलांच्या विनंतीनुसार 22 जानेवारीला अधिकाधिक प्रसूती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rohit Sharma च्या युवा शिलेदारानं झळकावलं द्विशतक!

IND vs SA | ‘फायनल’ तिसरा कसोटी सामना व्हायला हवा; दिग्गजाची मागणी

Smriti Mandhana चे ‘मानधन’ वाढलं! ट्वेंटी-20 मध्ये रचला इतिहास

Team India नं मैदान गाजवलं; नारी शक्तीनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवलं!

Indian Police Force Trailer l ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर आऊट