Smriti Mandhana चे ‘मानधन’ वाढलं! ट्वेंटी-20 मध्ये रचला इतिहास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Smriti Mandhana । भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात स्मृतीने शानदार अर्धशतकी खेळी केली. स्मृतीने 54 धावांच्या खेळीसह ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3 हजार धावा करण्याची किमया साधली. हे तिच्या ट्वेंटी-20 कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक होते आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धचे 7 वे अर्धशतक ठरले, जे तिने 50 चेंडूत पूर्ण केले.

Smriti Mandhana चा नवा विक्रम

स्मृती मानधनाने शेफाली वर्मासोबत पहिल्या बळीसाठी 137 धावांची भागीदारी नोंदवली. या दोघींच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 1 विकेट गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधनाने या सामन्यात 52 चेंडूंचा सामना करत 54 धावा केल्या. 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने तिने अर्धशतक पूर्ण केले. स्मृती 54 धावांवर बाद झाली पण शेफाली 64 धावा करून नाबाद राहिली.

खरं तर शेफाली वर्मा आणि स्मृतीने आणखी एक विक्रम केला तो म्हणजे भागीदारी. त्यांनी पहिल्या बळीसाठी 137 धावांची शतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 मध्ये भारतीय महिला सलामीवीरांनी केलेली ही पहिली शतकी भागीदारी आहे. या जोरावर भारताला सहज विजय मिळाला. डावादरम्यान दुसरी धाव घेताच मानधनाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Smriti Mandhana च्या 3 हजार धावा

स्मृतीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे. तिच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने केला होता. जगातील केवळ 6 महिला खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. स्मृतीने केवळ 122 व्या डावात ही कामगिरी केली आहे. हरमनप्रीतला इथपर्यंत पोहोचण्यासाठी 135 डाव लागले होते.

ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

सुझी बेट्स (न्यूझीलंड) – 152 सामन्यांत 4118 धावा
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) – 132 सामन्यांत 3405 धावा
स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) – 117 सामन्यांत 3236 धावा
हरमनप्रीत कौर (भारत) – 159 सामन्यात 3195* धावा
सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) – 127 सामन्यात 3107 धावा
स्मृती मानधना (भारत) – 126 सामन्यात 3052* धावा

भारताची विजयी सलामी

पाहुण्या ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने खराब कामगिरी केली. कांगारूंना 19.3 षटकांत सर्वबाद केवळ 141 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग भारताने 1 विकेट गमावून पूर्ण केला. यामध्ये शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांचे योगदान मोलाचे ठरले.

Indian Police Force Trailer l ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर आऊट

T20 World Cup 2024 l टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार भारत-पाक यांच्यात महामुकाबला

Deepika Padukone | ‘ओम शांती ओम’ नाही तर ‘हा’ होता दीपिकाचा पहिला चित्रपट

Aishwarya Rai | ‘…म्हणून मी गप्प आहे’; अभिषेक बच्चनने केला मोठा खुलासा

MS Dhoni | IPL पूर्वीच धोनीला मोठा धक्का, जवळच्याच मित्राने केला घात; जाणून घ्या नेमकं प्रकरण